पुन्हा राहुल नार्वेकरच… विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाणार; विरोधकांचं काय होणार?

आज दुपारी १२ वाजेपर्यंतच विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मात्र अद्याप दुसऱ्या कोणत्याही पक्षाने विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज केलेला नाही.

पुन्हा राहुल नार्वेकरच... विधानसभा अध्यक्ष बिनविरोध निवडला जाणार; विरोधकांचं काय होणार?
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 1:05 PM

Rahul Narvekar Assembly Speaker : भाजप नेते आणि आमदार राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राहुल नार्वेकर यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. आज दुपारी १२ वाजेपर्यंतच विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मात्र अद्याप कोणीही अर्ज दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कालपासून मुंबईत विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडत आहे. शनिवारी आणि रविवार या दोन दिवसांमध्ये 288 आमदारांना विधानसभेच्य सदस्यत्वाची आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येत आहे. यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यानंतर उद्या 9 डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी आज अर्ज दाखल करण्यात आले.

यानुसार राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल नार्वेकरांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार हे निश्चित मानले जात आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही आज दुपारी 12 वाजेपर्यंत होती. या मुदतीत महाविकासाआघाडीने एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.  त्यातच यंदा महायुतीकडे प्रचंड संख्याबळ आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावरील निवड होईल हे निश्चित झाले आहे.

सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर भाजपने विधानसभा अध्यक्षपदावर दावा करत त्याची जबाबदारी राहुल नार्वेकरांकडे दिली. यानंतर आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद जाणार आहे. यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे महाराष्ट्रातील पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद केली जाणार आहे.

राहुल नार्वेकरांचा अल्पपरिचय

राहुल नार्वेकर हे वकील असून त्यांनी शिवसेनेतून राजकीय कारकि‍र्दीला सुरुवात केली. राहुल नार्वेकरांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी दक्षिण मुंबईतील कुलाबा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

यानंतर आता झालेल्या २०२४ च्या निवडणुकीत देखील ते याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ते विजयी झाले. राहुल नार्वेकर हे २०२२ मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यावेळी त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती होते. त्यामुळे एकाचवेळी सासरे आणि जावई विधिमंडळाच्या दोन सभागृहांचे पीठासीन अधिकारी म्हणून कार्यरत होते. सर्वात कमी वयाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली आहे.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.