Raigad Suspected Boat | रायगड, सिंधुदुर्गातील हॉटेल आणि लॉजेसची कडक तपासणी, नाक्यांवर बंदोबस्त, हरिहरेश्वर बोटीसाठी अलर्ट!
रायगडः रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर (Harihareshwar) समुद्र किनारी आढळलेल्या बोटीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पोलीस (State police) यंत्रणेला सतर्कतेचा (Security Alert) इशारा देण्यात आला आहे. विशेषतः समुद्र किनारी भागात, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील प्रत्येक हॉटेल आणि लॉजवर पोलिसांची करडी नजर आहे. जिल्ह्यांतीन नाक्या-नाक्यांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काल दुपारी एक वाजेच्या सुमारास हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर एक […]
रायगडः रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर (Harihareshwar) समुद्र किनारी आढळलेल्या बोटीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील पोलीस (State police) यंत्रणेला सतर्कतेचा (Security Alert) इशारा देण्यात आला आहे. विशेषतः समुद्र किनारी भागात, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील प्रत्येक हॉटेल आणि लॉजवर पोलिसांची करडी नजर आहे. जिल्ह्यांतीन नाक्या-नाक्यांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काल दुपारी एक वाजेच्या सुमारास हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर एक संशयित बोट आली. या बोटीत कुणीही व्यक्ती नव्हता. मात्र त्यातील एका बॉक्समध्ये एके 47 बंदुका आढळून आल्या. या पार्श्वभूमीवर कोकण आणि मुंबई परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हॉटेल्स आणि लॉजेसवर छापेमारी
हरीहरेश्वर येथे समुद्रकिनारी मिळालेल्या बोटीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील पोलीस यंत्रणा हाय अलर्ट झाली आहे.काल सायंकाळ पासून समुद्रकिनारी भागात पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे. किनारपट्टी भागात जेथे जेथे होड्या लँडिंग होतात त्यासर्व ठिकाणी तसेच सर्व हॉटेल्स,लॉजेसची तपासणी करण्यात आली.स्थानिक मच्छीमार, सागर रक्षकदल सदस्य,वॉर्डन यांना देखील सतर्क करण्यात आलेले असून संशयित हालचाल दिसून आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास माहिती देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.जिल्ह्यात ठिकठिकाणी कडक तपासणी सुरू असून मुंबई गोवा महामार्गावरील गोवा सीमेलगत इन्सुलि तपासणी नाक्क्यावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून गोव्यातून येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. किनारी भागात पोलीस कर्मचारी ही तैनात करण्यात आले आहेत.
बोट आली कुठून?
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर किनाऱ्यावरती काल गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास एक संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमध्ये ak 47 बंदूक आढळून आलीये. हरिहरेश्वर किनाऱ्यावरती सचिन गुरव यांनाही संशयास्पद बोट पहिल्यांदा दिसली. किनाऱ्यापासून जवळपास दोन किलोमीटर आत मध्ये असणाऱ्या या बोटीला सचिन गुरव आणि हरिहरेश्वर मधल्या ग्रामस्थांनी किनाऱ्यावर आणलं. खोल पाण्यात जाऊन किनाऱ्याच्या जवळ आलेल्या या बोटीची पाहणी हरिहरेश्वर मधल्या ग्रामस्थांनी केली. त्यानंतर या बाबतची माहिती तत्काळ प्रशासन, पोलीसांना देण्यात आली. दहशतवाद विरोधी पथकदेखील याठिकाणी दाखल झाले असून बोटीवरचा बंदुक असलेला बॉक्स आता जप्त करण्यात आला आहे. तसेच बोटीच्या अधिक तपासासाठी लवकरच फॉरेन्सिक लॅबचं पथकदेखील घटनास्थळी दाखल होत आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
विधानसभेच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच ही बोट कुठून आली यासंदर्भातील प्राथमिक तपासासंदर्भात निवेदन वाचून दाखवलं. या बोटीत दहशतवादी अँगल दिसून येत नसला तरीही राज्यभऱातील पोलिसांना अलर्ट राहण्याचा इशारा देण्यात आळा आहे. 16 मीटर लांबीच्या माय लेडी हान अशा नावाची ही बोट आहे. मस्तकवरून 26 जून रोजी युरोपला जाताना ती भरकटली. एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली. मात्र लेडी हान बोटीचे टोइंग करता आले नाही. त्यानंतर ही बोट हरिहरेश्वर किनाऱ्याला लागली, अशी प्राथमिक तपासाची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात दिली.