Khalapur Irshalwadi Landslide Incident : इर्शाळवाडीत रात्री नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Raigad Irshalwadi Landslide Incident : इर्शाळवाडीमध्ये जाण्यासाठी 1.5 किमीपर्यंत चालत जावं लागतं. एकंदरित घटनाक्रम पाहिला तर, रात्री 11 वाजती डोंगराचा कडा कोसळला त्यानंतर लोकांना कशी माहिती झालं पाहून घ्या सर्वा घटनाक्रम.

Khalapur Irshalwadi Landslide Incident : इर्शाळवाडीत रात्री नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 4:00 PM

मुंबई : राज्यात बुधवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. नद्यांना पूर आलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. मात्र रायगडमधील इर्शाळवाडी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. इर्शाळवाडी गावावर डोंगरचा कडा पडल्याने संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गेलं आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत 12 जणांचे मृतदेह सापडले असून 100 पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली असून मदतकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी सकाळी 7.30 वाजता दाखल झाले होते, घटनेचा आढावा घेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आतापर्यंत 103 लोकांची ओळख पटली आहे यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे. काल रात्रीपासून मी या घटनेचा आढावा घेत आहे, ज्यांचा मृत्यू झालेल्यांना आणि जखमींना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. घटनास्थळी येतानाची वाट अवघड असून मदतकार्यात पावसामुळे अडचणी येत आहेत. मात्र आपले जवान जीव धोक्यात घालून काम करत आहेत. संपूर्ण डोंगर खाली आहे त्यामुळे 10 ते 15 फूट मातीचा ढिगारा असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

इर्शाळवाडी गावातील लोकांचं पुनर्वसन करण्यासंदर्भात तातडीने विभागीय आणि जिल्हायुक्त आयुक्तांशी बोललो असल्याचं शिंदेंनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून घटनेची माहिती घेतली आणि हवी ती मदत देऊ असं सांगितलं असल्याचं शिंदे म्हणाले.

संपूर्ण घटनाक्रम

इर्शाळवाडीमध्ये जाण्यासाठी 1.5 किमीपर्यंत चालत जावं लागतं. एकंदरित घटनाक्रम पाहिला तर, रात्री 11 वाजती डोंगराचा कडा कोसळला, 11.15 वाजता बाजूच्या भागातील लोक जमा झाले, रात्री 11.20 ला गावचे सरपंच दाखल झाले, रात्री 1 वाजता मंत्री उदय सामंत तर रात्री 3 वाजता गिरीश महाजन घटनास्थळी दखल, सकाळी 6.20 पासून NDRF टीमकडून बचावकार्य सुरू त्यानंतर 7.25 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल, 9 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदेचा फोन झाला, 11 वाजता 10 जणांचा मृत्यू आणि 80 जण वाचले आणि 100 जण अडकल्याची आकडेवारी समोर आली.

दरम्यान, जवळपास चाळीस कुटूंब हे दरडीखाली दबल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इर्शाळवाडीत पोलीस कंट्रोल रूमची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी 8108195554 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.