Raigad Irshalwadi Landslide : माझे सगळेच नातेवाईक गेले, आता मी काय करू…; स्थानिक महिलेच्या अश्रूंचा बांध फुटला

Raigad Khalapur Irshalwadi Landslide : रात्रीचे 11 वाजले होते, तितक्यात मोठा आवाज झाला...; इर्शाळवाडी दुर्घटना कशी घडली? स्थानिकांनी सांगितलं...

Raigad Irshalwadi Landslide :  माझे सगळेच नातेवाईक गेले, आता मी काय करू...; स्थानिक महिलेच्या अश्रूंचा बांध फुटला
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 10:57 AM

इर्शाळवाडी, रायगड | 20 जुलै 2023 : आजची सकाळ एका दुर्दैवी घटनेनं सुरु झाली. रायगडमध्ये दरड कोसळल्याची घटना समोर आली. खालापूरमधल्या इर्शाळवाडी गावावर डोंगर कोसळला आहे. प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. नागरिक मात्र टाहो फोडताना दिसत आहेत. आपल्या कुटुंबीयांची, नातेवाईकांची काही माहिती मिळत नसल्याने ते कासाविस झालेत.

इर्शाळवाडीच्या शेजारील गावातील, कामानिमित्त बाहेर असणारे लोक आता गावात दाखल झालेत. आपल्या आप्तेष्टांची माहिती मिळावी, यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

आमचे सगळेच नातेवाईक गेले, मी कसं करू, असं इर्शाळवाडीकर म्हणत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडेही हे नागरिक विनंती करत आहेत. काहीही करा पण आमच्या नातेवाईकांना वाचवा, असं हे लोक म्हणत आहेत.

माझ्या माहेरची लोकं गेली. माझी भावजय होती. भावाचा मुलगा, माझी बहीण, तिचं अख्खं कुटुंब अडकलं आहे. माझ्या बहीणीच्या घरी कुणीच नाही राहिलं. बहिणीची मुलं, नातवंड सगळी सगळी माणसं गेली, असं म्हणत एका आजीने टाहो फोटला.

माझ्या मुलीचं लग्न झालं आहे. ती इथं राहाते. तिलाच बघण्यासाठी मी बदलापूरहून आलोय, असं तिथं उपस्थित एका व्यक्तीनं सांगितलं आहे.

पाऊस जास्त झाला. डोंगर कोसळला. गाव मातीखाली गेला. माझी मुलं, माझी ननंद इथं अडकली आहे, असा महिलेनं सांगितलं.

मी सांची माणगाववरून आलो. माझ्या मुलीचं लग्न झालंय. ती इथं राहाते. तिच्यासोबत माझा मुलगा पण आहे. माझ्या मुलीच्या कुटुंबात सहा माणसं आहेत. त्यातल्या कुणाशीच संपर्क झालेला नाही. मला पहाटे फोन आला तेव्हा मला माहिती झालं. मी तसाच इकडं निघून आलो, असं एका उपस्थिताने सांगितलं.

इर्शाळवाडी माझं माहेर आहे. माझ्या आई-बाबांचा आणखी तपास नाही लागला. त्यांना शोधलं पाहिजे, असं म्हणत एका महिलेनं आपला आक्रोश व्यक्त केला आहे.

दरम्यान इर्शाळवाडी गावामध्ये झालेल्या दुर्घटनेबाबत खालापूरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक प्रशासनाची तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीला घटना स्थळी उपस्थित असलेले मंत्री देखील राहणार आहेत. मुख्यमंत्री आणि स्थानिक नेत्यांकडून, अधिकाऱ्यांकडून घटनेचा आढावा घेण्यात येत आहे.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.