रायगड पोलीस अधीक्षकांची अनोखी आयडिया, प्रवास परवान्यासाठी तयार केलेल्या पोर्टलचा राज्यातील पोलीस दलाला फायदा

कोरोना विषाणूच्या संकटामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात लॉकडाऊन (Raigad Superintendent of Police Anil Parsakar) घोषित करण्यात आला आहे.

रायगड पोलीस अधीक्षकांची अनोखी आयडिया, प्रवास परवान्यासाठी तयार केलेल्या पोर्टलचा राज्यातील पोलीस दलाला फायदा
Follow us
| Updated on: May 15, 2020 | 2:28 PM

रायगड : कोरोना विषाणूच्या संकटामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात लॉकडाऊन (Raigad Superintendent of Police Anil Parsakar) घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नागरिक आपल्या घरापासून लांब इतर शहरात अडकले आहेत. या सर्व नागिराकांना पुन्हा घरी पोहोचवण्यासाठी सरकारकडून परवाना दिला जात आहे. हा परवाना मिळवण्यासाठी नागरिक पोलीस स्टेशनबाहेर गर्दी करत आहेत. त्यामुळे रायगड पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी त्यांच्या कल्पनेतून एक पोर्टल तयार केले. या पोर्टलच्या माध्यमातून ते प्रवास परवाना देत आहेत. याच पोर्टलचा फायदा आता संपूर्ण महाराष्ट्राला होत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे काम सुसह्य झाले (Raigad Superintendent of Police Anil Parsakar) आहे.

प्रवास परवाना मिळवण्यासाठी पोर्टल तयार केल्याने याचा फायदा नागरिकांनाही झाला आहे. रायगड पोलीस अधिक्षक अनिल पारसकर हे पोलीस प्रशासनात काम करताना नेहमी लोकोपयोगी पडणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना राबविण्यात आघाडीवर आहेत. पारसकर यांनी हे पोर्टल केवळ रायगड जिल्ह्यापूर्ती तयार केले होते.

पोर्टल तयार केल्यानंतर सुरुवातीच्या दोन-तीन दिवसानंतर या पोर्टलची उपयोगिता राज्याचे पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे यांच्या कानावर आली. त्यानंतर भारंबे यांनी हे पोर्टल पाहिले आणि राज्यभर हे पोर्टल वापरण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार 28 मार्चपासून http://covid19.mhpolice.in या पोर्टलचा राज्य पातळीवर उपयोग सुरू करण्यात आला.

या पोर्टलवर परवाना मिळविण्याची प्रक्रिया सुलभ असल्याने परवान्यासाठी अर्ज करण्याऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रवासाचा परवाना मागण्यासाठी पोलिसांकडे राज्यातून आतापर्यंत तब्बल 20 लाख 84 हजार अर्ज आले आहेत. यापैकी 5 लाख 42 हजार जणांना पोलिसांनी आतापर्यंत प्रवास परवाना दिला आहे.

गेल्या 12 एप्रिल ते 12 मे या एका महिन्याच्या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यातून 98 लाख 17 हजार नागरिकांनी या पोर्टलला भेट दिली. रोज जवळपास चाळीस ते पन्नास हजार अर्ज येऊ लागले आहेत. अत्यंत आणीबाणीच्या काळात पारसकर यांनी तयार केलेल्या या पोर्टलमुळे पोलीस प्रशासनाचे काम सुसह्य होण्यास मदत झाली आहे.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनचं उल्लंघन, ठाण्याहून 30 कामगार विनापरवाना पालघरमध्ये, ठेकेदारावर गुन्हा दाखल

PHOTO : मजुरांची घरी जाण्यासाठी धडपड, कुणी पायी, कुणी सायकलवरुन, मिळेल त्या वाहनाने जीवघेणा प्रवास

लालपरी सज्ज, अडकलेल्या नागरिकांना ST मोफत गावी पोहोचवणार, ‘या’ अटींसह प्रवास शक्य

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.