Mahad Murder : महाडमधील सहा मुलांच्या हत्या प्रकरण, तीन पोलिस अधिकाऱ्यांची कमिटी करणार तपास

महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात सदर आरोपी महिला रुना सहानी (30) हिला अटक केली आहे. महिलेच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी तीन पोलिस अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करण्यात आली असून ही कमिटी पुढील तपास करीत आहे.

Mahad Murder : महाडमधील सहा मुलांच्या हत्या प्रकरण, तीन पोलिस अधिकाऱ्यांची कमिटी करणार तपास
महाडमधील सहा मुलांच्या हत्येचा तीन पोलिस अधिकाऱ्यांची कमिटी करणार तपासImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 4:16 PM

महाड : पती-पत्नीच्या वादातून सहा मुलांची विहिरीत ढकलून हत्या (Murder) करणाऱ्या महिलेच्या विरोधात महाड एमआयडीसी पोलिस (MIDC Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती सोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तिने हे कृत्य केल्याचे म्हटले असले, तरी यामध्ये इतर काही आहे का? याचा तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या कमिटीमार्फत तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेतील लहानग्या मुलांच्या मृतदेहांवर असनपोई गाव हद्दीत सामूहिक अंत्यसंस्कार (Mass Funeral) करण्यात येणार आहेत. मृतांमध्ये दीड ते दहा वर्षांच्या एक मुलगा आणि पाच मुलींचा समावेश आहे. रुना सहानी असे आरोपी मातेचे नाव आहे.

पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेने उचलले टोकाचे पाऊल

मूळचे उत्तर प्रदेशचे असलेले सहानी कुटुंब कामधंद्याच्या निमित्ताने महाडमधील ढालकाठी येथे आले. आरोपी रुना सहानी आणि तिचा पती चिखुरी सहानी यांच्यामध्ये नेहमी वाद होत असत. चिखुरीला दारुचे व्यसन आहे. दररोज तो घरी दारुच्या नशेत यायचा आणि पत्नीला त्रास द्यायचा. याच त्रासाला कंटाळून महिलेने आधी आपल्या सहा मुलांना विहिरीत ढकलले आणि त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेतली. मात्र महिलेला उडी घेताना तेथील आदिवासी पाड्यातील काही लोकांनी पाहिले. त्यांनी महिलेला वाचवले आणि पाड्यावर आणले. त्यानंतर त्यांनी महिलेकडे सदर प्रकाराबाबत विचारपूस केली असता महिलेने सर्व घटना सांगितली. त्यानंतर सहा मुलांना विहिरीत फेकल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस, बचाव पथक आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि सहाही मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.

याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात सदर आरोपी महिला रुना सहानी (30) हिला अटक केली आहे. महिलेच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्याकांडाचा सखोल तपास करण्यासाठी तीन पोलिस अधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करण्यात आली असून ही कमिटी पुढील तपास करीत आहे. (A committee of three police officers will investigate the murder of six children in Mahad)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.