Raigad Crime : माथेरानमध्ये आढळला शिर कापलेला महिलेचा मृतदेह, आरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

आज सकाळी माथेरानमधील इंदिरानगर येथे एका घरामध्ये चालवल्या जाणाऱ्या लॉजिंगमध्ये शिर कापलेल्या महिलेचे प्रेत आढळून आले. निर्वस्त्र असलेल्या या मृतदेहासोबत कोणतीही वस्तू तसेच बॅग, ओळखपत्र नव्हते. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुत वाढली आहे.

Raigad Crime : माथेरानमध्ये आढळला शिर कापलेला महिलेचा मृतदेह, आरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान
माथेरानमध्ये आढळला शिर कापलेला महिलेचा मृतदेह
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 8:56 PM

नेरळ : रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये औरंगाबादच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. माथेरानमधील एका लॉजवर एका महिलेचे शिर कापलेला मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. हत्येनंतर आरोपी महिलेचे शीर सोबत घेऊन पळून गेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेत आहेत. रायगड पोलीस गुन्हे अन्वेषण शाखा व माथेरान पोलीस प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.

आरोपीला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान

आज सकाळी माथेरानमधील इंदिरानगर येथे एका घरामध्ये चालवल्या जाणाऱ्या लॉजिंगमध्ये शिर कापलेल्या महिलेचे प्रेत आढळून आले. निर्वस्त्र असलेल्या या मृतदेहासोबत कोणतीही वस्तू तसेच बॅग, ओळखपत्र नव्हते. त्यामुळे या प्रकरणाची गुंतागुत वाढली आहे. लॉजचा केअर टेकर सकाळी चहा नाश्ता विचारण्यासाठी गेला असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच दरवाजाही लावलेला नव्हता. म्हणून केअर टेकरने आत जाऊन पाहिले असता महिलेचा विवस्त्र अवस्थेतील शीर नसलेला मृतदेह दिसला. त्यानंतर पोलिसांना याबाबत कळविण्यात आले.

घटनेची माहिती कळताच पोलीस तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. रायगड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका महिलेचे व तिच्या सोबत असलेल्या पुरुषाचे फोटो प्रसारीत केले असून यांना ओळखणाऱ्यांनी रायगड पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

लॉजमालकाने ओळखपत्राशिवाय दिली रुम

एका पुरुषासोबत आलेल्या महिलेच्या रुममध्ये इतर कोणतेही सामान सोबत आणलेले नव्हते. तसेच महिलेसोबत असलेला पुरुषही तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. तसेच सदर व्यक्तीने महीलेचे शिरही सोबत नेले असल्याचे कळते. ज्याने हे कृत्य केले आहे त्याने महिलेची ओळख न पटण्याची पूर्ण खबरदारी घेतली आहे. दरम्यान घरवजा लॉजिंग मालकाने रुम देण्याआधी या पर्यटकांकडून कोणतेच ओळखपत्र न तपासता पर्यटकांनाच रजिस्टरमध्ये नोंद करण्यास सांगून लॉजमालक बाहेर गावी निघून गेले. (A woman’s body was found in a lodge in Matheran Raigad)

इतर बातम्या

Pune crime|सिंहगड कॉलेजमधला २२ वर्षीय विद्यार्थी करायचा हाय टेक चोरी ; चोरीची पद्धत वाचून तुम्ही व्हाल हैराण

VIDEO | कल्याणमध्ये पक्षाचा प्रचार करणाऱ्या भाजप युवा मोर्चा अध्यक्षाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.