शिवसेनेतील गद्दार तोंड काळं करून पळाले; उदय बने या गद्दार उदयचा अस्त करेल; अनंत गितेंनी बंडखोरांवर डागली तोफ
अनंत गिते यांनी उदय सामंत यांच्यावर सडकून टीका करताना उदय सामंत यांना माज पैशाचा आलेला आहे. मात्र जो सच्चा शिवसैनिक आहे तो कधीही विकला जाणार नाही असा विश्वासही व्यक्त करत बंडखोरांना उत्तर देण्यासाठी मोठा मेळावा आयोजित करू, जनता आपल्या पाठीशी ठाम आहे.

रत्नागिरीः महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Agahdi) असताना आणि विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर राज्यात जे बंडखोरी नाट्य झाले त्याने फक्त राज्यातच राजकीय भुकंप झाला, असं नाही तर राष्ट्रीय राजकारणातही त्याचे परिणाम झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी (Rebel MLA) केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हाताला धरून सत्ता स्थापन झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावे लागल्यानंतर शिवसेनेतील निष्ठावान नेते आणि कार्यकर्त्यांनी बंडखोरांवर गद्दारपणाचा जप करत त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. यावेळीही रत्नागिरी शिवसेनेचे ज्येष्ठे नेते अनंत गिते (Anant Gite) यांनी बंडखोर नेत्यांवर टीका करत बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर शिवसेनेतील गद्दार तोंड काळं करून पळाले आहेत, आणि तो मी नव्हेच या नाटकातील एक लखोबा रत्नागिरीतील असल्याची टीका करत उदय सामंतावर त्यांनी निशाना साधला. यावेळी अनंत गिते सांगितले की, या बंडखोरांमुळे माझ्या अंगात संताप असल्याचेही त्यांनी सांगितले.
आम्ही स्वस्थ बसणार नाही
ज्यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आहे, त्या उदय सामंत यांचे अप्रत्यक्षपणे नाव घेत ते म्हणाले की, उदय बने या गद्दार उदयचा अस्त करणार हे नक्की आहे. सत्तेतून आणि राजकारणातून गद्दाराला काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा देत आता यांना परत माफी नाही परत आलेच तर त्याचे जोड्याने स्वागत करू अशी जोरदार टीकाही त्यांनी यावेळी केली.
सामंतांना पैशाचा माज
अनंत गिते यांनी उदय सामंत यांच्यावर सडकून टीका करताना उदय सामंत यांना माज पैशाचा आलेला आहे. मात्र जो सच्चा शिवसैनिक आहे तो कधीही विकला जाणार नाही असा विश्वासही व्यक्त करत बंडखोरांना उत्तर देण्यासाठी मोठा मेळावा आयोजित करू, जनता आपल्या पाठीशी ठाम आहे आणि भविष्यात शिवसेना ही स्वबळावरच आणि महाराष्ट्रावर भगवा फडकवेल असा विश्वास व्यक्त करत शिवसेना एक कुटुंब आहे आणि उद्धव ठाकरे हे आपले कुटुंबप्रमुख आहेत असंही त्यांनी सांगितले.
टकमक टोक दाकवयचे
शिवसेनेतून बंडखोरी करून गेलेले आणि भाजपच्या गोठात असलेल्या नेत्यांवरही अनंत गिते यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, ज्यांनी बंडखोरी केली आहे त्या गद्दाराना माफी नाही, याना टकमक टोक दाकवयचे, यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्या दोन्ही जिल्ह्यातील म्हणजेच रायगड-रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील 5 गद्दारांना धूळ चारल्याशिवाय गप्प बरणार नाही असा त्यांनी यावेळी विश्वासही व्यक्त केला आहे.
बंडखोर आमदार शिवसेनेच्या मुळावर
या गद्दारांना धडा शिकवायचा असून शिवसेनेतील प्रत्येक कार्यकर्त्यानी पेटून उठायचे आहे असा सल्ला देऊन हे बंडखोर आमदार शिवसेनेच्या मुळावर येऊ पाहत आहेत. मात्र आता न्यायालयाच्या निकाल थोड्याच दिवसात लागेल त्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह आमदारही अपात्र होणार होणार आहेत. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री राजीनामा देतील आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि त्यानंतर थोड्याच कालावधित गुजरातसोबत महाराष्ट्रातही निवडणुका लागतील असं भाकीतही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
अनंत गिते यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करत सांगितले की, आज शिवसेना संकटात आहे, ही आई संकटात आहे. आपल्याला या आईला वाचवायचं आहे. आम्हाला राजकीय जन्म देणारी शिवसेना ही माता आहे, आणि ही आई आज संकटात असल्यामुळेच तिला वाचवायचं आहे असं भावनिक आवाहनही त्यांनी केले आहे.