Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain | राज्यातील ‘या’ जिल्ह्याला रेड अलर्ट, शाळा आणि महाविद्यालयांना पावसामुळे सुट्टी जाहीर

School And Colleges Holiday due to Rain 26 July 2023 | भारतीय हवामान खात्याकडून महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांना बुधवारी 26 जुलैसाठी रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Rain | राज्यातील 'या' जिल्ह्याला रेड अलर्ट, शाळा आणि महाविद्यालयांना पावसामुळे सुट्टी जाहीर
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jul 26, 2023 | 4:03 AM

अलिबाग | राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय. या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये सातत्याने धुवाधार पाऊस होतोय. पावसाचा कहर पाहायला मिळतोय. नद्याच्या नद्या दुथड्या भरुन वाहतायेत. पावसाने गेल्या काही दिवसात चांगलाच हाहाकार माजवलाय. अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलय. हवामान खात्याने आज 26 जुलै रोजी एकूण 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. या रेड अलर्ट असलेल्या 4 जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणेचा समावेश आहे.

रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट

हे सुद्धा वाचा

या जिल्ह्यांना रेड अलर्ट असल्याने प्रशासन आणि मदत यंत्रणा या अलर्ट मोडवर आहेत. कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास मदत यंत्रणा या बचाव कार्यसाठी सज्ज आहेत. रायगड जिल्ह्याला असलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. रेड अलर्ट असल्याने जिल्हा प्रशासनाने रायगडमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन याबाबतीच माहिती देण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

दरम्यान रायगड जिल्ह्यातील 6 पैकी 1 नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटवरुन ही माहिती दिली आहे. त्यानुसार 25 जुलै रात्री 11 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, कुंडलिका नदीची इशारा पातळी ही 23.00 मी इतकी आहे. तर सध्याची पातळी ही 23.35 मी इतकी आहे.

कुंडलिका नदीने इशारा पातली ओलांडली

तर जिल्ह्यातील सावित्री, अंबा, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या 5 नद्यांची पाणी पातळी ही इशारा पातळी पेक्षा कमी आहे.

दरम्यान हवामान खात्याकडून राज्यातील मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज ऑरेन्ज अलर्ट आहे. त्यामुळे या 4 जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हा आहे.तसेच पालघर, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.