Matheran Shuttle Service : माथेरान-अमन लॉज शटल सेवा, माथेरान पर्यटनाला चालना; एका वर्षात 3 लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास

माथेरानला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हिवाळी सुट्टी हा सर्वात योग्य काळ असतो. नोव्हेंबर-2021 हा महिना रूपये 27.65 लाख प्रवासी उत्पन्नासह 42021 प्रवासी घेऊन अव्वल स्थानावर आहे आणि त्यानंतर डिसेंबर-2021 महिन्यात रुपये 27.11 लाख प्रवासी उत्पन्नासह 43,500 प्रवासी वाहतूक झालेली आहे.

Matheran Shuttle Service : माथेरान-अमन लॉज शटल सेवा, माथेरान पर्यटनाला चालना; एका वर्षात 3 लाखांहून अधिक प्रवाशांनी केला प्रवास
माथेरान-अमन लॉज शटल सेवा, माथेरान पर्यटनाला चालनाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 10:20 PM

कर्जत : माथेरान (Matheran) हे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ (Tourist Place) आहे. अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या प्रवाशांसाठी शटल सेवे (Shuttle service)सह मध्य रेल्वेने हे ठिकाण एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मध्य रेल्वेने 2021-2022 (एप्रिल ते मार्च दरम्यान) 3, 6, 763 प्रवाशांची वाहतूक केली आहे आणि अमन लॉज आणि माथेरान दरम्यान आठवड्याच्या दिवशी एकूण 16 सेवा आणि वीकेंडला 20 सेवांसह 42,613 पॅकेजेसची वाहतूक केली आहे. पर्यटकांना आरामदायी प्रवास देण्यासोबतच, या सेवा स्वस्त आणि जलद साहित्याची वाहतूक करण्यासही मदत करतात. यामुळे एप्रिल-2021 ते मार्च-2022 या कालावधीत रुपये 1.82 कोटी महसूल मिळाला आहे. यामध्ये रुपये 1.78 कोटी प्रवासी सेवेतून उत्पन्न आणि रुपये 3.29 लाख पार्सल उत्पन्नाचा समावेश आहे.

प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका

माथेरानला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हिवाळी सुट्टी हा सर्वात योग्य काळ असतो. नोव्हेंबर-2021 हा महिना रूपये 27.65 लाख प्रवासी उत्पन्नासह 42021 प्रवासी घेऊन अव्वल स्थानावर आहे आणि त्यानंतर डिसेंबर-2021 महिन्यात रुपये 27.11 लाख प्रवासी उत्पन्नासह 43,500 प्रवासी वाहतूक झालेली आहे. ही आकडेवारी या पर्यटन स्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते. मध्य रेल्वेने हे ठिकाण केवळ प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय केले आहे. हे टॉय ट्रेनमधील अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार प्रदान करते आणि त्यामुळे माथेरानच्या नैसर्गिक वातावरणातील शांततेत मग्न होते.

हे सुद्धा वाचा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.