Raigad Car Burn : मुंबई-पुणे एक्प्रेसवर कारला आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
पनवेल विचंबे येथील परदेशी कुटुंब लोणावळ्यातील कार्ला येथे एकवीरा देवीच्या दर्शनाला जात होते. मुंबई-पुणे जुना एक्स्प्रेसवरुन जात असतानाच दुपारच्या सुमारास बोरघाटात परदेशी कुटुंबाच्या कारने अचानक पेट घेतला. मात्र कारला आग लागल्याचे लक्षात येताच तात्काळ कारमधील लोकांना बाहेर काढण्यात आले. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रायगड : मुंबई पुणे जुन्या हायवे वर बोरघाटात निसान टेरानो या गाडी (Car)ला अचानक आग (Fire) लागली. कारमध्ये सात जण प्रवास करत होते. बहुतांश महिला या कारमध्ये होत्या. एक वयोवृद्ध आजी सुद्धा कारमध्ये होत्या. गाडीने पेट घेतल्यानंतर त्यांना घाई घाईने बाहेर काढण्यात आलं. सुदैवाने कोणालाही दुखापत (Injury) झाली नाही. आगीचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. भर दुपारी कार्ला आग लागल्याने हवा जोरात असल्याने बाजूच्या डोंगराला सुद्धा आग लागली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासोबत पोलिस आणि गुरुनाथ साठेलकर यांची टीम घटनास्थळी दाखल झाली.
लोणावळ्यात एकवीरा देवीच्या दर्शनासाठी चालले होते
पनवेल विचंबे येथील परदेशी कुटुंब लोणावळ्यातील कार्ला येथे एकवीरा देवीच्या दर्शनाला जात होते. मुंबई-पुणे जुना एक्स्प्रेसवरुन जात असतानाच दुपारच्या सुमारास बोरघाटात परदेशी कुटुंबाच्या कारने अचानक पेट घेतला. मात्र कारला आग लागल्याचे लक्षात येताच तात्काळ कारमधील लोकांना बाहेर काढण्यात आले. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबई पुणे एक्सप्रेस वे असू देत नाही तर मुंबई पुणे जुना हायवे असू देत. रोज काही ना काही तरी अपघात या हायवे वर होतच असतो. त्यामुळे हे दोन हायवे हॅपनिंग आहेत. तरी या दोन्ही रस्त्यावर मदतीला “अपघातग्रस्तांच्या मदतीला” ही स्वंयसेवी संस्था आणि शासनाच्या इतर यंत्रणा अपघात घडल्यास शेकडो हात मदतीला असतात. त्यामुळे अपघातग्रस्तांना तात्काळ मदत होते आणि जीवितहानीचे प्रमाण कमी होते. (Nissan Terrano car catches fire at Borghat on Mumbai-Pune Express, fortunately no casualties)