रायगड : रायगड (Raigad News) जिल्ह्यातील खळबळजनक माहिती समोर येते आहे. हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आलीय. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हाय अलर्ट (Raigad Red Alert) जारी करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बोटीमध्ये शस्त्र सापडली असल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात (Harihareshwar Boat News) वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात चोख नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे. प्रत्येकक वाहनाचीही कसून चौकशी तपास नाकाबंदी दरम्यान केला जातोय. शोथ पथकाद्वारे पुढील तपास केला जातोय. रायगड जिल्ह्यात सकाळच्या सुमारास हरिहरेश्वरचा समुद्र किनाऱ्यावर बोट आढळून आली होती. सुरुवातील ही बोट स्थानिक मासेमारांची असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. पण अखेर या बोटीत शस्त्रास्त्र आढळून आल्यामुळे एकच खळबळ माजली.
अखेर पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. AK 47 बंदुका या बोटीत आढळून आल्या असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप अधिकृत माहिती याबाबत देण्यात आलेली नाही. पोलिसांकडूनही या संपूर्ण प्रकरणी कमालीची गुप्तता बाळगली जात असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात सकाळच्या सुमारास हरिहरेश्वरचा समुद्र किनाऱ्यावर बोट आढळून आली होती. सुरुवातील ही बोट स्थानिक मासेमारांची असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता. पण अखेर या बोटीत शस्त्रास्त्र आढळून आल्यामुळे एकच खळबळ माजली. अखेर पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. AK 47 बंदुका या बोटीत आढळून आल्या असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र अद्याप अधिकृत माहिती याबाबत देण्यात आलेली नाही. पोलिसांकडूनही या संपूर्ण प्रकरणी कमालीची गुप्तता बाळगली जात असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबत ही बोट नेमकी आली कशी? याबाबत तपास करण्याची आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रवादीच खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांशीही बोलू, असं त्यांनी म्हटलंय. घातक शस्त्र सापडल्यानं प्रशासन अलर्ट झालंय. याआधीही समुद्रामार्गे अतिरेकी घुसले होते. त्यानंतर समुद्र किनाऱ्यामार्गे अतिरेकी हल्ला होऊ नये याअनुशंगाने बंदोबस्त कडक करण्यात आला होता. मात्र आता आढळून आलेली ही बोट नेमकी कुठची? ती हरिहरेश्वर किनाऱ्याजवळ कशी पोहोचली? त्यात असलेल्या घातक शस्त्र आढळून आल्यानं सखोल तपासाची गरज व्यक्त केली जातेय.
हरीहरेश्वरमध्ये सापडलेल्या बोटीवर शस्त्रास्त्र सापडली असल्याने रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सध्या राज्यात सणासुदीने वातावरण आहे. दहीहंडी, गणेशोत्सव तोंडावर आहेत, अशा स्थितीत राज्यात काही दहशतवादी कारवायांचा कट होता का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
ही बोट ओमान सिक्युरिटी बोट असल्याची माहिती समोर आली आहे. ही संशायस्पद बोट नसल्याचे आता प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. ही भरकटलेली स्पीटड बोट असल्याची माहिती आहे. बोटीत काही डिस्मेंटल हत्यारे असल्याची माहितीही देण्यात आली आहे.