आदित्य ठाकरे इर्शाळवाडीत दाखल; म्हणाले, नागरिक सुखरुप असावेत, एवढीच अपेक्षा!

Aditya Thackeray on Raigad Irshalgad Landslide आदित्य ठाकरे यांच्याकडून इर्शाळवाडीतील नागरिकांचं सांत्वन; पाहा काय म्हणाले...

आदित्य ठाकरे इर्शाळवाडीत दाखल; म्हणाले, नागरिक सुखरुप असावेत, एवढीच अपेक्षा!
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 3:43 PM

इर्शाळवाडी, रायगड | 20 जुलै 2023 : रायगडमधल्या इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळ्याची घटना घडली आहे. NDRF च्या पथकाकडून युद्ध पातळीवर या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे पोहोचले आहेत. स्थानिक नागरिकांशी संवाद साधत ते धीर देत आहेत. या नागिरकांचं आदित्य ठाकरे सांत्वन करत आहेत. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अनिल परब आणि सुनील प्रभू देखील आदित्य ठाकरे यांच्यासोबत इर्शाळवाडीत आहेत. इर्शाळवाडी गावाच्या पायथ्याशी दाखल ठाकरे गटाचे हे नेते दाखल झाले आहेत.

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेबाबत आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळी गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. इर्शाळगड इथून थोड्या अंतरावर आहे. मात्र तिथं गर्दी होता कामा नये. आपण तिकडे गेल्यानं मदत कार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी इथंच थांबून होईल ती मदत करावी, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

इर्शाळवाडीत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या गावातील नागरिक सुखरुप असावेत, एवढीच अपेक्षा एक सध्या अपेक्षा आहे, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणालेत.

इर्शाळवाडीतील परिस्थिती गंभीर आहे. अंबादास दानवे आणि मी, सुनील प्रभू वरती त्या गावात जाऊन आलो. मदतकार्य सुरु आहे. मदत कार्याला अडथळा नको म्हणून आम्ही खाली आलो आहोत. नागरिकांना धीर देण्याचा, सांत्वन करण्याता प्रयत्न केला. देवाकडे प्रार्थना करावी की सगळे सुखरुप असावेत, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

ही दुर्घटना सरकारला टाकता आली असती असं वाटतं का? आधीच पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं असं वाटतं का? असा सवाल विचारला असता ही राजकारण करण्याची जागा नाही. या सगळ्याबद्दल आम्ही विधानसभेत बोलू. पण आता नागरिकांना मदत मिळणं गरजेचं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील इर्शाळनाडीत दाखल झाले आहेत. तिथे त्यांनी घटनेची पाहणी केली. तसंच आपत्तीग्रस्त नागरिकांचं त्यांनी सांत्वन केलं.

नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळणं गरजेचं आहे. NDRF चे जवान त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांना स्थानिकही मदत करत आहेत. लवकरात लवकर मदत पोहोचून नागरिकांची सूटका व्हावी, एवढीच सध्या अपेक्षा आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.

प्रशासनाने दुर्घटनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.