Video | शिवसेना आमदाराच्या गाडीला अपघात, जाग्यावरच एकाचा मृत्यू
Shivsen MLA Car Accident : शिवसेनेचे आमदार असलेल्या महेंद्र दळवी यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दळवी यांच्या गाडील धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
रायगड, दिनांक 2 मार्च 2024 | शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीला अपघात झाला आहे. रायगड जिल्ह्यामधील उसडी गावातील टोल नाक्याजवळील तळारोड या परिसरात हा अपघात झाला. अलिबागचे आमदार असलेले महेंद्र दळवी यांच्या गाडीला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे. तर आमदार दळवी यांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.
पाहा व्हिडीओ :-
हा अपघात भीषण होता की दळवी यांच्या गाडीच्या एअर बॅगही धडकेनंतर उघडल्या गेल्या. अपघात झाल्यानंतर दळवी यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.