कामगारांना घेऊन कंपनीत चालली होती बस, पण पुलावर बसचा टायर फुटला अन्…

जेएसडब्लू कंपनीची बस नेहमीप्रमाणे पनवेल ते वडखळ अशी कामगारांना घेऊन कंपनीकडे चालली होती. मात्र मुंबई-गोवा महामार्गावरुन येत असताना अचानक बसचा टायर फुटला.

कामगारांना घेऊन कंपनीत चालली होती बस, पण पुलावर बसचा टायर फुटला अन्...
रायगडमध्ये बस अपघातात सहा जखमीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 6:24 PM

रवी खरात, पेण : पेण तालुक्यातील वडखळ डोलवी हद्दीत जे एस डब्ल्यू कंपनीची कामगारांना घेऊन जाणारी बस पलटी झाल्याची घटना घडली. उचेड नजीक ब्रिजवर टायर फुटून बस पलटी होऊन अपघात झाला. बसमध्ये 17 ते 18 कामगार प्रवास करत होते. यात सहा प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उपाचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस पलटी झाल्याने मुंबई गोवा महामार्गावरील लेनवर काही काळ वाहतूक खोळंबली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

बसचा टायर फुटल्याने अपघात

पेणवरुन जेएसडब्ल्यू कंपनीची बस कामगारांना घेऊन कंपनीत चालली होती. उचेड नजीक ब्रिजवर सकाळी सव्वा नऊच्या सुमारास टायर अचानक फुटून बस पलटी झाली. बस पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. या बसमध्ये 17 ते 20 कामगार प्रवास करत होते. सात ते आठ कामगार प्रवासी सध्या जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले.

वडखळ पोलिसात अपघाताची नोंद

इंद्रजित शंकरचंद्र सहा, प्राजक्ता श्रीराम मोडक, दिशाली विवेक पाटील, राहुल सदाशिव पाटील, चालक सुमित सुभाष जुईकर, देवेंद्र जगदिश भोईर अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश रुईकर अधिक तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.