Raigad Crime : माणगावात सापडले 8 जिवंत गावठी बॉम्ब, दोन आरोपींना अटक

माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मौजे पाणसई येथे गावठी बॉंब तयार करण्याचे साहित्यासह दोन आरोपींना माणगाव पोलीस ठाण्याकडून अटक (Arrest) करण्यात आली आहे. बाबू दगडू जाधव व राम यशवंत वाघमारे अशी अटक करण्यात आली आहे. रानडुकराची शिकार करण्याकरीता वापरण्यात येणारे गावठी बॉंब तयार करत होते.

Raigad Crime : माणगावात सापडले 8 जिवंत गावठी बॉम्ब, दोन आरोपींना अटक
माणगावात सापडले 8 जिवंत गावठी बॉम्बImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 11:21 PM

माणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात असणाऱ्या पाणसई आदिवासी वाडीत पोलिसांनी छापा (Raid) टाकून आठ गावठी बॉम्ब (Bomb) जप्त केल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे. या धाडीत दोन आरोपींनी बेड्या ठोकल्या आहेत. तर या गावठी बॉम्बचे कनेक्शन थेट मध्य प्रदेशमध्ये असल्याचे ही तपासात समोर येत आहे. माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मौजे पाणसई येथे गावठी बॉंब तयार करण्याचे साहित्यासह दोन आरोपींना माणगाव पोलीस ठाण्याकडून अटक (Arrest) करण्यात आली आहे. बाबू दगडू जाधव व राम यशवंत वाघमारे अशी अटक करण्यात आली आहे. रानडुकराची शिकार करण्याकरीता वापरण्यात येणारे गावठी बॉंब तयार करत होते.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला

माणगाव तालुक्यातील मौजे पाणसई आदिवासी वाडी येथे रानडुकराची शिकार करण्यासाठी गावठी बाँब तयार केले जात असल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या महितीनुसार पोलीस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात एका प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवलेले लहान सुपारीच्या आकाराचे 8 गावठी बॉम्ब, एका प्लॅस्टिकच्या पिशवीत सुमारे 2 किलो वजनाची पिवळ्या, काळ्या, लाल रंगाची पावडर, स्फोटक पदार्थ तयार करण्याकरीता वापरण्यात येत असलेले 100 ग्रॅम वजनाचे प्लॉस्टिक आढळून आले. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त करत दोन आरोपींना अटक केले.

तिसऱ्या आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथकाची नेमणूक

याप्रकरणी आरोपीं विरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि एन.डी.लहांगे हे करीत आहेत. आरोपींची चौकशी केली असता चासलाल नावाचा इसम गावठी बॉम्ब तयार करण्याकरीता लागणारे साहित्य पुरवतो, तसेच स्वत:ही तयार करून विकतो असे कळले. चासलाल हा मध्य प्रदेश येथील रहिवासी असून त्याचा शोध घेण्यासाठी माणगाव पोलिसांचे पथक नेमण्यात आले आहे. (Two accused arrested with bomb in Mangaon Raigad)

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.