पिकनिकला गेलेले मुंबईतील तरुण धरणात वाहू लागले, वेळीच पोलिसांचे लक्ष गेले अन् अनर्थ टळला !

सध्या पावसाळा सुरु असल्याने धबधबे, धरण परिसर, नद्या या ठिकाणी पावसाळी सहलीसाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. मात्र पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे अनेकदा दुर्घटना घडतात.

पिकनिकला गेलेले मुंबईतील तरुण धरणात वाहू लागले, वेळीच पोलिसांचे लक्ष गेले अन् अनर्थ टळला !
गाढेश्वर नदीत वाहून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी वाचवलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 11:02 AM

पनवेल : धरणावर पिकनिकला गेलेल्या तरुणांना धरणाच्या पाण्यात अंघोळ करणे चांगलेच महागात पडले आहे. धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरल्यानंतर पाण्याचा प्रवाहात दोघे वाहून जाऊ लागले. वाहत वाहत एका झुडुपाजवळ अडकून बसले होते. यादरम्यान पनवेल तालुका पोलिस ठाणे हद्दीतील नेरे बीटमध्ये पोलीस गस्त घालत होते. पोलिसांनी दोन तरुण पाण्यात अडकल्याचे पाहिले. यानंतर पोलिसांनी दोरीच्या सहाय्याने तरुणांना सुखरुप बाहेर काढले. सुदैवाने पोलीस वेळेत पोहचले म्हणून तरुणांचे प्राण वाचले. सोहेल खावजौद्दिन अहमद शेख आणि मनोज शंकर गांगुर्डे अशी त्या दोघांची नावे आहेत. नदी, समुद्र किनारे, धबधबे या ठिकाणी जाण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात येत असतानाही पर्यटक अतिउत्साहात तेथे जात असल्यामुळे या घटना घडतात.

नदीत पोहण्याचा मोह आवरला नाही मग…

मुंबईतील सोहेल खावजौद्दिन अहमद शेख आणि मनोज शंकर गांगुर्डे हे दोन तरुण पनवेलमधील गाढेश्वर धरणावर शनिवारी पिकनिकला गेले होते. यावेळी नदीत पोहण्याचा मोह तरुणांना आवरला नाही. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने प्रवाहात तरुण वाहू लागले. मात्र नदीतील झुडुपाजवळ अडकून बसले. याचदरम्यान पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील नेरे बीट चौकीचे पोलीस गस्त घालत तेथे आले. त्यांनी तरुणांना पाण्यात अडकलेले पाहिले. यानंतर तात्काळ पोलिसांनी दोरीच्या सहाय्याने दोघांना सुखरुप बाहेर काढले. पोलिसांनी अतिउत्साह टाळण्याचे आणि सतर्कतेचे आवाहन पर्यटकांना केले आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.