अगं अगं म्हशी… लोकलखाली म्हैस आल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत

सायंकाळी 5:30 वाजता लोणावळ्यावरून पुण्याच्या दिशेनं ही लोकल मार्गस्थ झाली. या लोकलखाली म्हैस अडकल्याने लोकल जागीच थांबून होती. तब्बल 30 मिनिटे लोकल थांबविण्यात आली होती.

अगं अगं म्हशी... लोकलखाली म्हैस आल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 7:57 PM

पुणे : अपघात, सिग्नल यंत्रणेतील बिघाड किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याच्या घटना नेहमीच घडत असतात. पुण्यात मात्र एक काम म्हशीमुळे रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाल्याची घटना घडली आहे. लोकल खाली म्हैस आल्याने पुण्याहून मुंबईकडे येणारे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे सर्व एक्सप्रेस आणि लोकल ट्रेन अर्धा तास विलंबने धावल्या.  लोणावळ्याहुन पुण्याला जाणाऱ्या लोणावळा-पुणे लोकलखाली(Lonavala-Pune local) एक म्हैस आली. या मार्गावरील घोरावाडी स्टेशनजवळ एक म्हैस आल्याने लोणावळा लोकलचा खोळंबा झाला. लोकलच्या धडकेत या म्हैशीचा मृत्यू झाला.

सायंकाळी 5:30 वाजता लोणावळ्यावरून पुण्याच्या दिशेनं ही लोकल मार्गस्थ झाली. या लोकलखाली म्हैस अडकल्याने लोकल जागीच थांबून होती. तब्बल 30 मिनिटे लोकल थांबविण्यात आली होती.

काही रेल्वे प्रवासी खाली उतल्यावर या मृत म्हशीला लोकलच्या खालून बाहेर ओढून काढण्यात आले. यानंतर लोकल पुण्याच्या दिशेला मार्गस्थ झाली. या अपघातामुळे लोणावळा पुणे लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक अर्ध्या तासाने कोलमडले.

पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा प्रकार घडला. यामुळे मुंबई-पुणे मार्गावर याचा परिणाम झाला. मुंबईतून पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. याचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसला आहे. पुण्याहून मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबईत नोकरी निमित्ताने येत असताता. संध्याकाळी साडे पाचची वेळ ही परतीची वेळ असते. यामुळे या वेळेत या मार्गावरुन हजारो प्रवासी प्रवास करत असतात. रेल्वे वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

रेल्वे इंजीनमध्ये अडकून तब्बल 8 किलो मीटर पर्यंत फरफटत गेला

उत्तर प्रदेशातील कौशींबी जिल्ह्यात हा थराराक अपघात घडला आहे. सैनी कोतवाली परिसरातील घुमई गावाजवळ हा अपघात झाला. दिल्ली-हावडा मार्गावरुन कानपूरकडून येणाऱ्या ट्रेनने एका तरुणाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती हा तरुण रेल्वेच्या इंजिनमध्ये अडकला. या धडकेनंतर अपघात ग्रस्त तरुण इंजीनसह रेल्वे ट्रॅकवरुन 8 किलो मीटर पर्यंत फरफटत गेला. दरम्यान, ही रेल्वे सिरथूच्या कांशीराम कॉलनीजवळ पोहोचली असता रेल्वे ट्रॅक जवळील शेतात काम करणाऱ्या लोकांना रेल्वेच्या इंजिनला तरुणाचा मृतदेह लटकत असल्याचे पाहिले.नागरीकांनी धावाधाव करत ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. ट्रेन थांबल्यानंतर इंजिनमध्ये अडकलेल्या तरुणाचा मृतदेह बाजूला काढण्यात आला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.