Solapur Rain Live Update: सोलापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, वैराग-जवळगाव रस्ता पाण्यात, कुरनूर धरणातून विसर्ग

वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेला असून वैराग जवळगाव रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोलापुरातील कारंबा येथील ओढा देखील भरून वाहत आहे. (Solapur rain update)

Solapur Rain Live Update: सोलापुरात पावसाची जोरदार बॅटिंग, वैराग-जवळगाव रस्ता पाण्यात, कुरनूर धरणातून विसर्ग
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 12:27 PM

सोलापूर : जिल्ह्यासह सोलापूर शहरामध्ये जोरदार पाऊस सुरूच आहे. वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेला असून वैराग जवळगाव रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोलापुरातील कारंबा येथील ओढा देखील भरून वाहत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसामुळे ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. कुरनूर धरणाच्या 6 दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. अक्कलकोट तालुक्यातील दुधनीतील ओढे वाहत आहेत. कल्याणनगर भागातील 25 ते 30 घरात पाणी शिरले आहे.  (Rain continue in Solapur water come on road water released from Kurnur dam)

[svt-event title=”कल्याणनगर भागातील 25 ते 30 घरामध्ये गुडघाभर पाणी” date=”14/10/2020,12:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अक्कलकोट तालुक्यातील दुधनीतील सर्व ओढे नाले वाहू लागले” date=”14/10/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. वैराग शहराला पाणीपुरवठा करणारा हिंगणी प्रकल्प नुकताच ओव्हरफ्लो झाला होता. पावसामुळे वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेल्यामुळं या रस्त्यावरिल वाहतूक बंद झाली आहे.

कारंबा येथील ओढा ओव्हर फ्लो झाल्यामुळं नागरिकांनी पाण्यातून वाट काढत जीवघेणा प्रवास सुरू आहे. दूधविक्रेत्यांनी जीव धोक्यात घालून या ओढ्यातून शहराकडे प्रवास केला. सध्या कारंबा येथील ओढ्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू आहे.

अक्कलकोट राजवाड्याचा दुर्बिण बुरुज ढासळला

पावसामुळे अक्कलकोट जूना राजवाड्याचा ऐतिहासिक दुर्बिण बुरुज 373 वर्षांनी ढासळला आहे. छत्रपती शाहू महाराज (संभाजी राजे यांचे पूत्र)यांनी अक्कलकोट संस्थानची निर्मिती केली होती.

कुरनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले

सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळं अनेक धरण प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. कुरनूर धरण क्षेत्रात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाल्यानं धरणाच्या सहा दरवाजातून 1800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हिंगणी प्रकल्प ओव्हरफ्लो

बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा मध्यम प्रकल्प हिंगणी शंभर टक्के भरला आहे. प्रकल्प ओव्ह फ्लो झाल्यानं भोगावती नदीला पूर आला होता. हिंगणी प्रकल्प भरल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. यामुळे वैराग शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने भोगावती नदीला पूर आला होता. भोगावतीला पूर आल्यानं रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले होते. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

शनिवार पासून सुरू असलेल्या पावसाने पंढरपूर मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. सोयाबीन सह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोलापूरमध्ये चार दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे.

संबंधित बातम्या :

सोलापुरातील हिंगणी प्रकल्प ओव्हर फ्लो,  भोगावती नदीला पूर

Maharashtra Rain | पंढरपूर तालुक्यातील डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचं नुकसान, शेतकरी संकटात

(Rain continue in Solapur water come on road water released from Kurnur dam)

शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.