राज्यात अवकाळीने दाणादाण, रात्रीपासून अनेक ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, वाचा कुठे काय स्थिती?

Rain in Maharashtra | पुढचे दोन दिवस राज्यातील वातावरण ढगाळ राहून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

राज्यात अवकाळीने दाणादाण, रात्रीपासून अनेक ठिकाणी वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, वाचा कुठे काय स्थिती?
RainImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 9:07 AM

मुंबई : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मराठवाडा (Marathwada), विदर्भासह, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र परिसरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाला (Unseasonal rain) सुरुवात झाली आहे. १५ मार्च रोजी दुपारपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं. रात्रीच्या सुमारास काही भागांना वीजेचा कडकडाट आणि मुसळधार पावसानं झोडपून काढलं. मागील अवकाळीच्या फटक्यातून अद्याप न सावरलेल्या बळीराजावर हे दुसरं एक संकट कोसळलं आहे. पुढचे दोन दिवस राज्यातील वातावरण ढगाळ राहून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

धुळ्यात काय स्थिती?

धुळे जिल्ह्यात १० दिवसांमध्ये सलग दुसऱ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा या चारही तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान झाले. पपई आणि केळीच्या फळबागांना सर्वाधिक फटका बसला आहे. तर बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी घेऊन ठेवलेलं धान्यही या अवकाळी पावसामुळे ओले झाले.

APMC

नागपूर येथील एपीएमसीमध्ये शेतमालाचं नुकसान

नंदूरबारमध्ये बाजार समिती बंद

नंदूरबार जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. जिल्ह्यात आठवडाभरात तीनदा अवकाळी पाऊस आला असल्याने, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी येणारा घास हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांचं अधिक नुकसान होऊ नये यासाठी नंदुरबार बाजार समिती पुढील तीन दिवस बंद राहणार आहे. शेतीतून काढून आणलेलं पीक विकण्यासाठी ठेवण्यात आलं होतं मात्र अवकाळी पावसामुळे याचे देखील मोठं नुकसान होत आहे.

वर्ध्यात वीजेच्या कडकडाटासह बरसात

वर्धा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात रात्रीच्या वेळी विजेच्या कडकडाटसह पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. अवकाळी पाऊस, हवेमुळे गहू, चणा आदी पिकांवर संकट निर्माण झालंय

पुण्यातही फटका

पुणे शहर परिसरात रात्री धायरी, पौड रोड, वडगाव मावळ भागात विजांचा कडकडाटसह पाऊस झाला. साताऱ्यात कराड शहरासह ग्रामीण भागात वीजाच्या कडकडासह हलक्या पावसाने हजेरी लावली. पुण्याच्या भोर तालुक्यातील विसगाव खोरे परिसरात असणाऱ्या गावांना संध्याकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसानं झोडपलं. अर्धा तास पडलेल्या मुसळधार पावसानं आजूबाजूच्या परिसरात पाणीच पाणी झालं. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

मुंबईलाही चाकरमान्यांची फिजिती

मुंबईत आज सकाळपासूनच काही भागात पाऊस सुरू झाला आहे. पुर्व ऊपनगरात चेंबूर, मुलूंड , कुर्ला तर पश्चिम उपनगरात बांद्रा , सांताक्रुझ , बोरिवली, दहिसर या परिसरात सकाळपासूनच अवकाळी पाऊस सुरू आहे. वाऱ्याचा वेगही वाढलाय. ठाणे जिल्ह्यातही बदलापूर, अंबरनाथ भागात पहाटेपासून पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे ऑफिसला जाणा-यांची तारांबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये जोरदार पाऊस

नाशिक मध्ये रात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने आधीच अडचणीत आलेला बळीराजा आणखी अडचणीत सापडला आहे.. मागच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे अद्यापही झालेले नसताना आता पुन्हा एकदा या अवकाळी पावसाने बळीराजाला जोडपून काढला आहे.. अचानक झालेल्या या अवकाळी मुळे कांदा कोबी द्राक्ष भाजीपाला या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाल आहे .

मराठवाड्यात काय स्थिती?

मराठवाड्यातही संभाजीनगर ,जालना, परभणी, नांदेड, हिंगोली भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. संभाजीनगरात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु आहे. तर ग्रामीण भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा जोर दिसून येत आहे. -हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात रात्री अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे संत्रा ,आंबा या फळबागांचे नुकसान झाले. तर उभ्या असलेला गहू,हरबऱ्यासह इतर पिकांचे ही मोठे नुकसान झाले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.