महापुराचा धसका, कोल्हापुरात धरणांमधून 4 हजार क्सूसेक पाण्याचा विसर्ग
कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. (Kolhapur dam water released) धरणक्षेत्रात काल 35 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस झाला. (Kolhapur dam water released) धरणक्षेत्रात काल 35 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षीच्या पुराचा धोका ओळखून, यंदा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून पावसाच्या सुरुवातीलाच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध धरणांतून तब्बल 4 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. (Kolhapur dam water released)
यामध्ये राधानगरी 800 क्सूसेक, वारणा 1500 क्यूसक आणि दुधगंगा धरणातून 1700 क्यूसेक विसर्ग करण्यात आला. जूनच्या पहिल्याच दिवशी पावसाचे जोरदार आगमन झाल्याने महापुराच्या धास्तीने कोल्हापूरकरांची तयारी सुरु झाल्याचं चित्र आहे. महापुराची स्थिती उद्भवू नये म्हणून धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला.
दरम्यान कालही कोल्हापूरसह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. आज सकाळीदेखील पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. मात्र दुपारनंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळं पावसाची चाहूल लागलेल्या कोल्हापूरकरांनी रेनकोट तसंच आणि सुरक्षेची साधने खरेदी करण्यासाठी दुकानांबाहेर गर्दी केली. यामुळं सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाला.
बिंदू चौक परिसरातील एका प्रसिद्ध दुकानाच्या बाहेर साहित्य खरेदी साठी रांग लागली होती, तर दुकानामध्येही नियम धाब्यावर बसवून लोकांना प्रवेश देण्यात आला होता. एका बाजूला जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढतोय, अशावेळी सामाजिक संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येक घटकाची आहे. मात्र आज रेनकोट खरेदीच्या निमित्ताने या सगळ्याकडे नागरिक आणि दुकानदारांनी दुर्लक्षच केल्याचं चित्र पाहायला मिळालं.
कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बधितांच्या आकड्यांन आता 600 चा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल गडहिंग्लज तालुक्यातील एका वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
(Kolhapur dam water released)