Weather Report: निसर्गाचा लहरीपणा आणखी 2 दिवस, कोकण – मराठवाड्यात अवकाळी, विदर्भात मात्र अंगाची लाहीलाही

भर उन्हाळ्यात देखील ऊन-पावसाचा खेळ अनुभवयास मिळत आहे. दरवर्षी अवकाळी ही ठरलेली असते पण यंदा अवकाळीचा मुक्काम हा वाढत आहे. त्यामुळे फळबागांसह हंगामी पिकांवरही परिणाम होऊ लागला आहे. गत आवठवड्यात उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागात मर्यादित असणारा पाऊस आता पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यापर्यंत आगेकूच करीत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर गारपिट होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

Weather Report: निसर्गाचा लहरीपणा आणखी 2 दिवस, कोकण - मराठवाड्यात अवकाळी, विदर्भात मात्र अंगाची लाहीलाही
अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील हंगामी पिकांचे नुकसान झाले आहे.
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 2:13 PM

मुंबई : भर उन्हाळ्यात देखील ऊन-पावसाचा खेळ अनुभवयास मिळत आहे. दरवर्षी (Unseasonable Rain) अवकाळी ही ठरलेली असते पण यंदा अवकाळीचा मुक्काम हा वाढत आहे. त्यामुळे फळबागांसह हंगामी पिकांवरही परिणाम होऊ लागला आहे. गत आवठवड्यात उत्तर महाराष्ट्र आणि कोकण भागात मर्यादित असणारा पाऊस आता पश्चिम महाराष्ट्रासह (Marathwada) मराठवाड्यापर्यंत आगेकूच करीत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर गारपिट होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. एकीकडे ही अवस्था असताना मात्र, विदर्भात (Temperature Increase) तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांपासून अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली असताना यामध्ये अणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

उत्तर भारतामधील वातावरणाचा असा हा परिणाम

उत्तर भारतामध्ये यंदा उष्णतेची लाट निर्माण होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने महिन्याभरापूर्वीच वर्तवला होता. त्यानुसार राजस्थान, गुजरात, झारखंड आणि मध्यप्रदेशात महिन्याभरापासून उष्णतेच्या झळांमध्ये वाढ होत आहे. याचाच परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर झाला आहे. उत्तर भारतामधून उष्ण वारे हे महाराष्ट्राकडे वाहत आहे. तर दक्षिणेकडून दमट वारे वाहत आहे. हे दोन्ही वारे महाराष्ट्रात आल्यावरच धडकत आहे. त्यामुळेच कोकण, मध्य महाराष्ट्र आणि आता मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तावण्यात आली आहे. या भागात 13 व 14 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. बुधवारी मराठवाड्यात दिवस उजाडल्यापासून ढगाळ वातावरण आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात गारपिटचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे.

चक्रीय स्थितीचा परिणाम राज्यातील वातावरणावर

केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या इतर भागामध्येही वातावरणात बदल झालेला आहे. उत्तर प्रदेश ते विदर्भ पार करुन मध्य प्रदेशचा काही भागाकडे द्रोणीय स्थिती आणि हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे राज्यात कुठे तापमानात वाढ तर कुठे अवकाळी अशी अवस्था झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला ‘यलो अलर्ट’

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपिटीसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापूर्वीपासून कोकणात तर पाऊस होतच आहे पण पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये गारपिटीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या :

Hapus Mango : आंबा खवय्यांसाठी महत्वाची बातमी, वाढत्या उन्हाचा काय झाला परिणाम?

Nashik : तोडणीला आलेला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी, कारखान्याची टाळाटाळ अन् महावितरणच्या मनमानीचा शिकार ठरतोय शेतकरी

Solapur : …ही आतषबाजी नाही! फटाक्यांच्या ट्रकवर कोसळली वीज; सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरचा प्रकार, पाहा Video

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.