राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये : संजय राऊत
समझने वालों को इशारा काफी है! असे ट्विट संजय राऊत (Sanjay Raut On CM Uddhav Thackeray Vidhan Parishad MLA) यांनी केलं.
मुंबई : कोरोना संकटामुळे विधानपरिषद निवडणूक लांबणीवर पडली (Sanjay Raut On CM Uddhav Thackeray Vidhan Parishad MLA) आहे. त्यातच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकीबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद धोक्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत समझने वालों को इशारा काफी है, अशा आशयाचं ट्विट केलं आहे.
राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है! असे ट्विट संजय राऊत (Sanjay Raut On CM Uddhav Thackeray Vidhan Parishad MLA) यांनी काही तासांपूर्वी केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सदस्यत्वाचं राजकारणाचा निर्णय अद्यापही होत नसल्याने संजय राऊतांनी हे ट्विट केलं आहे.
राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 19, 2020
राज्यपाल कायदेशीर सल्ला घेण्याच्या तयारीत
दरम्यान उद्धव ठाकरेंची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करावी, अशी शिफारस 6 एप्रिलला राज्यपालांकडे करण्यात आली आहे. मात्र राज्यपालांनी अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्यपाल आता यावर कायदेशीर सल्ला घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
याआधी मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या 2 नियुक्त्या राज्यपालांनी फेटाळल्या आहेत. या फेटाळलेल्या 2 जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरेंची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे जरी नेमणूक केली, तरी ही नेमणूक ही मूळ सदस्याच्या कालावधीपुरतीच असेल. त्यामुळे सर्व 12 सदस्यांची एकदाच नियुक्ती व्हावी, असं राज्यपालांचं मत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा : स्पेशल रिपोर्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमके आमदार कसे होणार?
मात्र, जर राज्यपालांनी निर्णय घेतला नाही तर उद्धव ठाकरेंसमोर नेमके पर्याय काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
तसेच येत्या काही दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीबाबत निर्णय घेतला गेला नाही, तर राज्यपालांना शिफारस स्वीकारण्याबद्दल पुन्हा विनंती करावी लागेल. अन्यथा 3 मेनंतर लॉकडाऊन संपल्यानंतर लगेचच निवडणूक घेता येऊ शकते.
मात्र निवडणूक घेण्यासाठी किमान 12 दिवस हवे. त्यामुळे लॉकडाऊननंतर 4 ते 27 मे असा 24 दिवसांचा कालावधी मिळतो. उद्धव ठाकरे यांना 27 मे रोजी मुख्यमंत्री होऊन 6 महिने पूर्ण होतील. त्याआधी आमदारकी मिळवणं आवश्यक आहे.