Raj Thackeray : अमित ठाकरेंना नोटीस नाही पाठवली ही उद्धव ठाकरेंची मेहरबानी, दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

अनेक मनसे नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या तसेच अनेक मनसे नेत्यांची धडपकड करण्यात आली. त्यानंतर या कारवाईवरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिले. मात्र आता यावरुन शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी राज ठाकरेंना टोलेबाजी केली आहे.

Raj Thackeray : अमित ठाकरेंना नोटीस नाही पाठवली ही उद्धव ठाकरेंची मेहरबानी, दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला
राज ठाकरेंना भिती वाटत असेल आदित्य ठाकरेंचा हात पकडून अयोध्येला जावा, दिपाली सय्यद यांनी पुन्हा डिवचलंImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 13, 2022 | 7:11 PM

मुंबई : राज्यात सध्या मनसे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा पेटला आहे. गुढी पाडव्याच्या सभेतून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा हिंदुत्वावरून डकाळी फोडली. तसेच शिवसेनेला टार्गेट करत पाहटेच्या शपथविधीपासून ते सरकार स्थापनेपर्यंतच्या सर्व घटनांचा समाचार घेतला. त्यानंतर शिवसेनाही (Shivsena) राज ठाकरेंविरोधात आक्रमक झाली. मात्र बॅकफूटवर न जाता राज ठाकरेंनी पुन्हा मशीदीवरील भोंग्यांविरोधात जोरादार हल्लाबोल चढवला. तसेच मनसेने हनुमान चालीसा आंदोलन तीव्र केलं. त्यानंतर राज्य सरकारकडून अनेक मनसे नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या तसेच अनेक मनसे नेत्यांची धडपकड करण्यात आली. त्यानंतर या कारवाईवरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिले. मात्र आता यावरुन शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी राज ठाकरेंना टोलेबाजी केली आहे.

राज ठाकरेंना टोलेबाजी

या पत्राबाबत बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या, या प्रकरणात अमित ठाकरेंना नोटीस पाठवली नाही ही मेहरबानी उद्धव ठाकरेंची राज ठाकरे यांनी कधी विसरू नये. दिपाली सय्यद या नेहमीच शिवसेनेची बाजू मांडत विरोधकांवर निशाना साधत असातात. कधी देवेंद्र फडणवीस तर कधी अमृता फडणवीस तर कधी इतर भाजप नेते त्यांच्या टार्गेटवर असतात. मात्र थेट राज ठाकरेंना टार्गेट केल्याने मनसेही दिपाली सय्यद यांच्याविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. आता मनसे यांना काय प्रत्युत्तर देणार? हे काही दिवसात कळेलच. मात्र सध्या मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरल्याने शिवेसना नेत्यांकडून त्यांच्या नवहिंदू ओवैसी अशीही टीका होत आहे. त्याला मनसेही जोरादर प्रत्युत्तर देत आहे.

राधाकृष्ण विखेंचा शिवसेनेवर पलटवार

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका होत असातना आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. अयोध्येला जाणं म्हणजे हिंदूत्व सिद्ध होत नाही. एकजण हिंदूत्व सिद्ध करण्यासाठी जातोय हे नाटक आहे. दुसऱ्या बाजुला दुटप्पी भूमिका घेत आहेत. हनुमान चालीसा म्हणणारांवर देशद्रोह लावताय. आणी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणारांना केवळ गाडायची भाषा करायची. त्यामुळे शिवसेनेने सत्ता टिकवण्यासाठी हिंदूत्व गुंडाळून ठेवलंय. असे म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केलीय. गेल्या अनेक दिवसांपासू राज्यात हिंदुत्वावरून वार पलटवार सुरू आहेत. आता उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बीकेसीत सभा आहे. त्यामुळे या सभेत मुख्यमंत्री या टीकेचा समाचर घेणार एवढं मात्र नक्की.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.