राज्यातील सत्तासंघर्षावर कधी बोलणार राज ठाकरे स्पष्टच बोलले, कधी बोलणार याचा मुहूर्तही सांगून टाकला..

| Updated on: Feb 27, 2023 | 1:58 PM

महाराष्ट्रात झालेले सत्तांतर आणि त्यानंतर शिवसेनेतील फूटीवर अद्यापपर्यन्त राज ठाकरे यांनी भाष्य केलं नव्हतं, मात्र त्यावर लवकरच राज ठाकरे बोलणार असून त्याचा मुहूर्त देखील सांगितला आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर कधी बोलणार राज ठाकरे स्पष्टच बोलले, कधी बोलणार याचा मुहूर्तही सांगून टाकला..
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी राज्यातील सत्तासंघर्षाचा संदर्भात मी लवकरच बोलणार असल्याचं जाहीर केलं आहे. याबाबतची वेळही राज ठाकरे यांनी सांगून टाकली आहे. राज ठाकरे हे गुढीपाडव्याला होणाऱ्या मेळाव्यात महाराष्ट्रातील सत्तांतर ( Maharashtra Political ) आणि सत्तासंघर्षावर बोलणार असल्याचं त्यांनी स्वतः जाहीर केलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये मराठी राज भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मनसेच्या वतिने पनवेलमध्ये या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी राज ठाकरे बोलत होते.

यावेळी राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी मुलाखतीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर भाष्य करत असतांना महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी मला आत्ता कुठलाही ट्रेलर दाखवायचा नाही मी डायरेक्ट पिक्चर दाखवणार असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे.

पनवेल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतिने राजभाषा दिनाचं आयोजन करण्यात आले आहे. गेल्या चार दिवसापासून हा कार्यक्रम सुरू असून त्यामध्ये आज राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यात राज ठाकरे यांनी मार्मिक उत्तरे दिले आहे.

हे सुद्धा वाचा

त्यामध्ये मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या बद्दल आपल्याला काय वाटतं हा कळीचा मुद्दा विचारण्यात आला होता. त्यावर राज ठाकरे यांनी बोलणं टाळत यावर कधी बोलणार आहे हे सांगून टाकलं आहे.

महाराष्ट्रात 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होईल अशी स्थिती असतांना अचानक मोठी राजकीय घडामोड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोबत घेऊन भाजपने सरकार स्थापन केले.

त्यानंतर ते सरकार अवघ्या तीन दिवसांत कोसळले. आणि शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यात महाविकास आघाडी झाली. आणि नवं सरकार स्थापन झाले. आणि त्यानंतर अडीच वर्षे ते सरकार चालले.

त्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि भाजपसोबत शिवसेनेच्या काही आमदारांनी सरकार स्थापन केले. त्यात मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे हे विराजमान झाले. आणि नंतर पक्षासहित चिन्हही शिंदे यांना मिळाले आहे.

त्यामुळे शिवसेनेत पडलेली उभी फुट पाहता उद्धव ठाकरे यांना सत्तेसह पक्षही गमवावा लागला आहे. अशातच सत्तेत असेलेल्या सरकारसह राज ठाकरे यांच्या नंतरच्या काळात मोठी जवळीक वाढली. मात्र, त्यानंतर राज ठाकरे यावर फारसे बोलले नव्हते.

त्यावर आजच्या प्रकट मुलाखतीत राज ठाकरे यांना त्यावर प्रश्नही विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी बोलणं टाळलं पण यावर कधी बोलणार हे स्पष्ट केले आहे. गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे हे कुणावर निशाणा साधतात आणि काय भाष्य करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.