Raj Thackeray ; पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यंची धरपकड, राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र जसच्या तसं

हजारो मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावत शांत राहण्याचा इशारा दिला. तर कित्येक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर आता आक्रमक झालेल्या राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खरमरीत पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी काही खरमरीत सवाल केले आहेत.

Raj Thackeray ; पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यंची धरपकड, राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र जसच्या तसं
पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यंची धरपकड, राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र जसच्या तसंImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 10, 2022 | 5:13 PM

मुंबई : राज्यात सध्या हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) विरुद्ध मशीदीवरील भोंगे, असे जोरदार वाद सुरू आहे. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशीदीवरील भोंग्याविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यावर उतरले. त्यांनी अनेक ठिकाणी अजानच्या वेळी हनुमान चालीसा चालवली. त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली. अनेक मनसे नेते या धडपकडीवेळी नॉच रिचेबल झाले. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा तर पोलिसांनी शोधही सुरू केला. हजारो मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावत शांत राहण्याचा इशारा दिला. तर कित्येक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर आता आक्रमक झालेल्या राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांना एक खरमरीत पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी काही खरमरीत सवाल केले आहेत. त्या पत्रातील मजकूर पुढील प्रमाणे आहे…

राज ठाकरेंचं पत्र जसच्या तसं

श्री. उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री,

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र राज्य

सस्नेह जय महाराष्ट्र!

सर्व देशबांधवांना मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दि. ४ मे रोजी ‘भोंगे उतरवा’ आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरुंगात डांबलं. कशासाठी? ध्वनिप्रदूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी!

गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की; मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले ‘रझाकार’ आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.

राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!

आपला नम्र,

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.