‘ज्यांची मतं दिसली त्यांचेही आभार अन्, ज्यांची…’, राज ठाकरेंचा ईव्हीएमवरून पुन्हा हल्लाबोल
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून पुन्हा एकदा ईव्हीएमवरून जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यांनी खोचक टोला लगावला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून पुन्हा एकदा ईव्हीएमवरून जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यांनी खोचक टोला लगावला आहे. ‘काही जण म्हणतात हरलेला पक्ष. झालं निवडणुका संपल्या. सर्व गोष्टी झाल्या. गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून मनसेला मत दिली, ज्यांची मतं दिसली त्या सर्वांचे मी आभार मानतो. ज्या मतदारांनी मनसेला मतदान करूनही ईव्हीएम मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाही, त्यांचेही आभार मानतो. निवडणुका कशा झाल्या. काय काय गोष्टी झाल्या. यावर मी बोललो. जे झालं ते झालं. आता पुढे बघायचं, असा हल्लाबोल यावेळी राज ठाकरे यांनी केला आहे.
चौफेर फटकेबाजी?
दरम्यान गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. मला बरंच बोलायचं आहे. निवडणुका झाल्यावर अनेक विषय झाले. अनेक विषय बोलले गेले. सदिच्छांचे अनेक फोनही आले. नेमके आजच मला फोन आले. आज का आले याचे अर्थ मला समजतो. जरा जपून, असा खोचक टोला यावेळी राज ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या, त्यातील काही गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. त्यातला पहिला विषय म्हणजे कुंभ मेळा. मी त्या दिवशी म्हटल्यानुसार, बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं. मी त्यांना म्हटलं पिणार नाही. मग नव्याने वारं शिरलेल्यां हिंदुत्वाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला.
आमचे नयन कदम जाऊन आले. आत गेल्यावर हा हा असं झालं म्हणे. हं हं नाही खालून प्रेत गेलं असेल एखादं असं मी त्यांना म्हटलं. आपल्या देशात नद्यांची भीषण अवस्था आहे, ज्यांना आपण माता म्हणतो, ज्यांना आपन देवी म्हणतो त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालं आहे. गंगा साफ झाली पाहिजे असं म्हणणारे पहिले व्यक्ती म्हणजे राजीव गांधी, पंतप्रधान झाल्यावर त्यांनी गंगा साफ करण्याचं काम सुरू केलं. तेव्हापासून आपन गंगाच साफ करत आहोत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.