Raj Thackeray : कुणाला नोटिसा तर कुणाची धरपकड, तर काही अंडरग्राऊंड; पोलीस ॲक्शनमोडमध्ये आल्यानंतर मनसे गनिमीकाव्याच्या तयारीत?

औरंबादच्या सभेत अटी मोडल्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या अटकेचीही शक्यता आहे. पोलिसांनी आता मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे काही मनसेचे नेते आणि कार्यकर्ते हे नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे.

Raj Thackeray : कुणाला नोटिसा तर कुणाची धरपकड, तर काही अंडरग्राऊंड; पोलीस ॲक्शनमोडमध्ये आल्यानंतर मनसे गनिमीकाव्याच्या तयारीत?
राज ठाकरे, मनसे अध्यक्षImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 6:10 PM

मुंबई : राज्यात पोलिसांनी सध्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात (MNS) कारवाईचा धडाका सुरू आहे. काहींना नोटीसी बजावल्या आहेत, तर काही मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे. नोटीसा बजावलेल्यांमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव अशा मनसे नेत्यांचा समावेश आहे. राज्यभरात जवळापस 15000 हजार मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्याची (Police Notice) माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे औरंबादच्या सभेत अटी मोडल्यामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या अटकेचीही शक्यता आहे. पोलिसांनी आता मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे काही मनसेचे नेते आणि कार्यकर्ते हे नॉटरिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. ही कारवाई पोलिसांनी राज्यभर सुरू केली आहे. त्यामुळे आता राज्यात हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे.

कुणाला नोटीसा, कुणाची धरपकड?

  1. मुंबईत बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासह अनेक मनसे कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पोलिसांकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
  2. भोंग्यांविरोधात सर्वप्रथम हनुमान चालीसा वाजविणारे चांदीवली मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना घाटकोपर, चिरागनगर पोलिसांकडून बर्वेनगर स्मशानभूमी येथून अटक केली आहे. तसेच त्यांच्या कार्यालयातून भोंगेही जप्त केले आहे.
  3. पुण्यातील काही प्रमुख मनसे पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजवल्याचीही माहिती समोर आली आहे. शिवाय पदाधिकाऱ्यांना पुणे पोलिसांचे फोन गेल्याचीही माहिती समोर आली आहे. तसेच प्रमुख पदादाधिकाऱ्यांना अटक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसे कार्यकर्त्यांना नोटीस द्यायला सुरुवात झाल्यानंतर पुण्यातील अनेक मनसेचे नेते नॉटरिचेबल आहेत.
  4. मात्र उद्याच्या अल्टीमेटमवर मनसैनिक ठाम आहे अशी प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आली आहे. राज ठाकरेंचा आदेश आमच्यासाठी महत्वाचा आहे. अशी शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची भूमिका आहे. नोटीसा दिल्या तरी राज ठाकरे जे सांगतील ते आम्ही करणार, असे साईनाथ बाबर म्हणाले आहेत.
  5. हे सुद्धा वाचा
  6. पिंपरी चिंचवड मधील मनसेच्या शहराध्यक्ष सह प्रमुख 30 ते 40 कार्यकर्त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी सीआरपीसी 149 प्रमाणे नोटिसा दिल्या असल्याचीही माहिती समोर आली आहे. तर इथलेही कार्यकर्ते राज ठाकरेंच्या आदेशावर ठाम आहेत.
  7. उस्मानाबाद पोलीसही एक्शन मोडमध्ये आले आहेत.मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. CRPC 1973 चे कलम 149 प्रमाणे मनसे पदाधिकऱ्यांना पोलिसांनी लेखी नोटीस दिल्याची माहिती समोर आली आली आहे. विनापरवाना भोंगा / स्पीकर लावून नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आलाय.
  8. “कायद्यापेक्षा कुणीही मोठं नाही, आणि कायद्याच्या वर जाऊन कुणी काही करत असेल, तर कारवाई व्हायला हवी” मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
  9. अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात,आमच्यावरही झालेत. व्यक्ती कितीही मोठी असू द्या, कायद्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल होतात. अशी सूचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
  10. सरकारची भूमिका आहे की मनसेवर दबाव निर्माण करायचा. जेव्हा अटी टाकल्या होत्या तेव्हाच आम्हाला काळाल होतं. आम्ही घाबरत नाही संघर्ष करत राहणार. आम्ही कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढली आहे. भोंग्यासंदर्भात राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करु, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
  11. तर नवनीत राणा, राज ठाकरे आणि नारायण राणे म्हणजे ट्रिपल आर चित्रपट असल्याची टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहेत. तर पोलीस तयारीत आहेत, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
  12. पुण्यातील शिरूरमधील मनसेचा कार्यकर्ता 10 दिवसासाठी तडीपार करण्यात आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी काढले तडीपारचे आदेश काढले आहेत. नानासाहेब लांडे असं मनसैनिकाचं नावं असल्याची माहिती समोर आली आहे

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.