Raj Thackeray : राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिबंधात्मक कारवाईची मागणी, पुण्यातल्या भाषणाला कुणाचा विरोध?
राज ठाकरे यांच्या भाषणातून कायदा - सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्या भाषणावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे (Republican Yuva Morcha) नेते राहुल डंबाळे यांनी अप्पर पोलीस आयुक्त डहाळे यांची समक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली.
पुणे : मनसेच्या गोटात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आलीय. कारण राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) पुण्यातल्या उद्याच्या भाषणाला (Pune MNS) विरोध झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रविवार दिनांक 22 मे रोजी पुणे येथिल गणेश कला क्रिडा केंद्र येथे होणाऱ्या सभेत राज ठाकरे यांच्या भाषणातून कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्या भाषणावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे (Republican Yuva Morcha) नेते राहुल डंबाळे यांनी अप्पर पोलीस आयुक्त डहाळे यांची समक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली. त्यामुळे आता मनसे कार्यकर्ते आक्रमक मोडवर येण्याची शक्यता आहे. एकिकडे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थिगित झाला आहे. या दौऱ्यालाही उत्तर प्रदेशातून भाजप खासदाराचा मोठा विरोध झाला आणि आता पुण्यातल्या भाषणालाही विरोध झाल्याने चर्चांणा उधाण आलं आहे.
पत्रातून नेमकी मागणी काय?
या निवेदनात सभेवर बंदी आणावी या सोबतच त्यांचे भाषणाची लिखित स्क्रीप्ट पोलिसांनी तपासावी तसेच औरंगाबाद पोलिसांप्रमाणे त्यांना अटी व शर्थी घालाव्यात अशी मागणी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी निवेदनावर कार्यवाही न केल्यास या संदर्भात मेहरबान कोर्टाकडेही दाद मागण्याचे निश्चित केले आहे. सदर निवेदनाचू प्रत पोलिस आयुक्त यांनीही पाठवण्यात आली आहे, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन या सभेबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लगले आहे.
मनसेकडून सभेची जोरदार तयारी
पुणे मनसेकडून या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे त्यांच्या स्थगिती झालेल्या अयोध्या दौऱ्याबाबत आणि इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य करण्याची शक्यता आहेत. तसेच गेल्या तीन सभेत महाविकास आधाडीला टार्गेट करणारे राज ठाकरे याही सभेत तोच सूर आवळणार का? हेही पाहणं महत्वाचंं ठरणार आहे.
पुन्हा हनुमान चालीसा हिंदूत्व?
राज ठाकरेंनी गेल्या तीन सभांमधून मशीदीवरील भोंग्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत हनुमान चालीसा पठणाची हाक दिली. तसेच हिदुत्वाचा मुद्दाही चांगलाच उचलून धरला. त्यामुळे त्यांच्या नवहिंदू ओवैसी अशी टीकाही झाली. त्यांचाही समाचर राज ठाकरे या सभेतून घेण्याची दाट शक्यता आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे राज ठाकरेंच्या सभा झाल्या नव्हत्या. आता मात्र राज ठाकरेंनी राज्यात सभांचा सपाटा लावला आहे.