ठाणे: राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्याच्या भाषणात भाजपची भलामण केल्यानंतर त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी टीका केली. ईडीची (ed) नोटीस आल्यानंतर राज यांनी ट्रॅक बदलल्याचं बोललं जात होतं. त्याला राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलाल अशी माझ्यावर टीका झाली. मी नाही ट्रॅक बदलला. मला नाही लागत ट्रॅक बदलायला. माहिती करून काही घ्यायची नाही. आयएनएलएफएस या कंपनीची चौकशी होती. मी त्यातून एका वर्षातून बाहेर पडलो. हे झेंगाड परवडणारं नाही म्हणून. म्हणजे कुणी व्यवसाय करायचा की नाही? त्या कंपनीची चौकशी लागली म्हणून मला नोटीस आली. मी गेलो. पण शरद पवारांना (sharad pawar) नुसती चाहूल लागली. ईडीची नोटीस येते. त्यावर केवढं नाटक केलं. या हाताने पापच केलं नाही, तर नोटीस कोणतीही येऊ दे, राजकीय किंवा कायदेशीर भीक नाही घालत त्याला, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांची ठाण्यात अतिविराट सभा पार पडली. यावेळी त्यांनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिलं. ज्यावेळी बोललो तेव्हा उघड बोललो. या भूमिका नाही पटल्या. मोदींनी 370 कलम रद्द केलं. तेव्हा अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं. मोदी सारखा पंतप्रधान या देशाला मिळावा असं बोलणारा मी होतो. नंतर बाकीचे बोलले. राजीव गांधी नंतर बहुमत मिळालेल्या पंतप्रधानाकंडून काय व्हावं हे भाषणात बोललो. आजही तीच मागणी आहे. पण मोदींना सांगणं दोन मागण्या पूर्ण करा. देशावर उपकार होतील. एक म्हणजे समान नागरी कायदा आणा. दुसरं म्हणजे देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा आणा. आम्हाला आसूया नाही आमच्याकडे एक,. तुमच्याकडे पाचपाच आम्हाला त्याचा त्रास होत नाही. पण लोकसंख्या वाढीने देश फुटेल. पण या गोष्टी देशात होणं गरजेचं आहे. आवश्यक आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
आता व्यासपिठावर येताना अग्निशमन दलाचा बंब दिसला. इतकी काय आग नाही लावणार. आज दुपारी पोलीस अधिकाऱ्याचा फोन आला. आता म्हणाला, काही छुटक फुटक संघटना तुमचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. म्हटलं माझा. म्हणे, आम्ही त्यांना डिटेन करू. फक्त तुमचा निघण्याचा टायमिंग सांगा. मी म्हटलं निघताना सांगतो, अशी त्यांनी भाषणाची सुरुवात केली.
माझ्या ताफ्याला कोण तरी अडवणार हे इंटेलिजन्सला कळलं. पण पवारांच्या घरी एसटीचे लोकं जाणार आहेत हे इंटेलिजन्सला नाही कळलं. खरं तर त्यांना प्रत्येक गोष्ट माहीत असते. एखादा माणूस शिंकला तर तो कोरोनाचा शिंकला की साधा शिंकला हे त्यांना माहीत असतं. सभा का घेतो मी. काहीच कारण नाही. गुढी पाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी आपआपले तारे तोडले. अनेक राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी तारे तोडले. मला वाटलं की याचं उत्तर ते दिलं पाहिजे. पण मला पत्रकार परिषद घेऊन याचं उत्तर द्यायचं नव्हतं. कारण पत्रकार परिषद घेतली असती तर या सर्व पक्षांना बांधिल असलेले पत्रकार त्या शिरतात आणि मूळ विषय बाजूला राहतो. मला तो भरकटवायचा नव्हतो. मग अविनाशला बोलावलं. ठाण्याला सभा घ्यायचं सांगितलं. म्हटला जरूर करू, जोरदार करू. दिसतंच आहे. आताची ही सभा महाराष्ट्रात काही ठिकाणी वीज नाही म्हणून दाखवली जात नाही काही ठिकाणी. काय मूर्ख माणसं आहेत. मोबाईलवर सर्व दिसतं. तुमच्या करंटची अपेक्षा कुणाला? आपली सभा मोठे सक्रिन लावून जम्मूत दाखवली जात आहे. अनेक राज्यात दाखवली जात आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Raj Thackeray Speech LIVE : राज ठाकरेंची वादळी उत्तरसभा लाईव्ह, इतर पक्षांचे “भोंगे” बंद होणार-मनसे