Raj Thackeray Speech : राज ठाकरेचं “वचन” सत्य वचन, राजगर्जनेवर फडणवीसांची पहिली प्रतिकिया
राज ठाकरेंच्या यंदाच्या भाषणाचीही (Raj Thackeray Live) मागील काही दिवसांपासून जोरदार हवा होती. शिवतीर्थावरील राज ठाकरेंच्या भाषात आज फक्त महाविकास आघाडी टार्गेट होतं. त्याची सुरूवातच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (Cm Uddhav Thackeray) खरपूस समाचार घेत केली.
मुंबई : मनसेचा गुढी पाढव्याचा मेळावा (Mns Gudipadwa Melava) हा नेहमीच चर्चेत असतो. राज ठाकरेंच्या यंदाच्या भाषणाचीही (Raj Thackeray Live) मागील काही दिवसांपासून जोरदार हवा होती. शिवतीर्थावरील राज ठाकरेंच्या भाषात आज फक्त महाविकास आघाडी टार्गेट होतं. त्याची सुरूवातच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा (Cm Uddhav Thackeray) खरपूस समाचार घेत केली. जमलेल्या लोकांना बोलताना, 2019 ची विधानसभेची निवडणूक आठवा. भाजप सेना विरुद्ध कोण दोन काँग्रेस. निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. अडीच अडीच वर्ष ठरली होती. आमच्याशी तर कधी बोलला नाही तुम्ही. ज्या सभा घेतल्या त्यात बोलले नाही. मोदी आले तेव्हा व्यासपीठीवर बसला होता. त्यावेळी मोदींनी सांगितलं भाजपचा मुखमंत्री होईल. फडणवीस तील. तेव्हा तुम्ही व्यासपीठावर होता तुम्ही काहीही बोलला नाही. असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट मुख्यमंत्रिपदावरून टार्गेट केलं. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही तशीच प्रतिक्रिया आली आहे.
राज ठाकरे सत्य बोलत आहेत
देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना, मी राज ठाकरेंचं भाषण ऐकलं नाही, मात्र तुम्ही सांगत आहात असेच राज ठाकरे बोलले असतील तर ते बरोबर बोलत आहेत. सर्वात मोठा पक्ष भाजप असून आज सत्तेतून बाहेर आहे. मात्र हे तीन पक्ष एकत्र येत लोकांची फसवणूक करत सत्तेत बसले आहेत, त्यामुळे राज ठाकरे अगदी सत्य बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया देत, राज ठाकरेंचं वचन हे सत्य वचन असल्याचे बोलले आहे. राज ठाकरे यांनी बोलताना, शिवसेने भाजपला फसवल्याचा थेट आरोप केलाय. मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शहा बोलले तेव्हाही उद्धव ठाकरे काही बोलले नाही,मग निकाल लागला आणि लक्षात आलं आपल्यामुळे सरकार अडतंय. त्यावेळी टूम काढली अडीच वर्षाचं काय झालं. कोणती? कधीची? असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.
चर्चा खुलेपणे का केली नाही?
तसेच मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या खोलीत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली होती असे नेहमी सांगतात, राज ठाकरेंनी त्याचाही चांगलाच समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरे सांगतात अमित शहाशी एकांतात बोललो होतो. मग बाहेर का नाही बोलला? मुख्यमंत्रिपद महाराष्ट्राचं, लोकांचं ती गोष्ट चार भिंतीत का झाली? असा सवाल त्यांनी केला. तसेच शहा म्हणतात असं काही बोलणं झालं नाही. एकेदिवशी सकाळी उठलो काय अन् पाहतो तो काय जोडा वेगळाच, असे म्हणत त्यांनी पाहटेच्या शपथविधीचाही खरपूस समचार घेतला. अजित पवार आणि फडणवीसांच्या शपथविधीवर टीका करताना राज ठाकरेंनी यावेळी अजित पवारांची नक्कलही केली.
Raj Thackrey Speech : कितीही लाथा मारल्या ढुंगणावर, राज ठाकरेंनी, मलिक, भुजबळांची जेलवारी काढली