मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी कोर्टात हजेरी लावणार

राज ठाकरे यांनी जामीन घेतला नसल्यानं 6 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे वाशी कोर्टात हजेरी लावणार
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 10:55 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार राज ठाकरे उद्या वाशी कोर्टात हजेरी लावणार आहेत. राज ठाकरे यांनी जामीन घेतला नसल्यानं 6 फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. नायाधीश बडे यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान हा आदेश देण्यात आला. मनसे कार्यकर्त्यांनी 2014 मध्ये वाशी टोलनाफा फोडला होता. त्या प्रकरणात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे.(Raj Thackeray will appear in Vashi court saturday)

26 जानेवारी 2014 रोजी राज ठाकरे यांनी वाशी इथल्या मेळाव्यात टोल नाका बंद करण्याबाबत प्रक्षोभक भाषण केलं होतं. त्यानंतर गजाजन काळे यांनी काही कर्यकर्त्यांसह लगेच वाशी टोल नाका फोडला होता. त्याबाबत 30 जानेवारी 2014 रोजी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात 2018, 2020 मध्येही राज ठाकरे यांच्याविरोधात समन्स आणि वॉरंट काढण्यात आलं होतं. आज ते वॉरंट रद्द झालं आहे. मात्र 6 फेब्रुवारीला राज ठाकरे यांनी कोर्टात उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्यामुळे राज ठाकरे आता वाशी कोर्टात हजर राहतात की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज ठाकरेंचा ‘एकला चलो रे’चा नारा

शिवसेनेला आणि पर्यायानं महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजप आणि मनसेची युती होऊ शकते, या चर्चेला खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. राज ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांना एकला चलो रेचा नारा दिला आहे. भाजपसोबत जाण्याबाबत आता लगेच निर्णय नाही, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे एकत्र येणार, या चर्चेला आता ब्रेक लागला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मनसेच्या 14 जणांच्या कोअर कमिटीसोबत बैठक घेतली. ही बैठक जवळपास 2 तास चालली. यावेळी राज ठाकरे यांनी पालिका निवडणुकीसंदर्भात अहवाल देण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यातील आगामी महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना एकला चलो रेचा नारा देत कामाला लागण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या :

शिवसेना-भाजपचा मनसेला ‘दे धक्का’; राज ठाकरेंसाठी ‘हा’ मराठी अभिनेता पुढे सरसावला

‘त्या’ 320 पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात मनसेला यश, मोठा धक्का टळला

Raj Thackeray will appear in Vashi court Saturday

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.