Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही राज ठाकरेंच्या पुढच्या वाटचालीवर… संजय राऊत यांचं मोठं विधान काय?

भूतकाळात कोणी कशा भूमिका बदलल्या त्याची जंत्रीच राज ठाकरे यांनी काल सादर केली होती. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचा कालखंड वेगळा होता. तेव्हाचा प्रसंग आणि घडामोडी वेगळ्या होत्या. त्यामुळे त्यांनी भूमिका बदलल्या. आज ते आहे का? आज महाराष्ट्र संकटात आहे. राज्य खतम करण्यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवायची, ठाकरे ब्रँडच्या विरोधात दिल्ली उभी आहे. अशावेळी भूमिका बदलून चालणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

आम्ही राज ठाकरेंच्या पुढच्या वाटचालीवर... संजय राऊत यांचं मोठं विधान काय?
राज ठाकरेंबद्दल संजय राऊत यांचं मोठं विधान काय?
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 11:16 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कारल ईव्हीएमच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला. या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सरकारला घेरलं. त्यामुळे राज ठाकरे आता महायुतीच्या विरोधात रणमैदानात उतरणार का? अशी चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे राज ठाकरे यांना महाविकास आघाडीचे दरवाजे उघडे असतील का? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आला. पण राऊत यांनी त्यावर थेट असं उत्तर दिलं नाही. एखाद्या भाषणाने किंवा विषयामुळे राजकीय दिशा बदलत नसते, असं संजय राऊत म्हणाले. मात्र, आम्ही राज ठाकरे यांच्या पुढच्या वाटचालीवर लक्ष ठेवून आहोत, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या ईव्हीएमबाबतच्या भूमिकेचं स्वागत केलं. राज ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यात मांडलेला हा विषय आहे. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी घेतलेली ही एक सरळसोट भूमिका आहे. त्या भूमिकेचं स्वागत करण्यास काहीच हरकत नाही. त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत, त्याला विरोध करावा असं काही नाही. राज्यात विरोधासाठी विरोध अशी लाट आली आहे. त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

एका भाषणावर कसं सांगू?

राज ठाकरे महाविकास आघाडीत येतील की नाही हे त्यांच्या एका भाषणावर कसं सांगू? त्यांच्या भविष्यातील भूमिका काय असतील, त्या महत्त्वाच्या आहेत. त्यांनी ईव्हीएण बाबत एक भाषण केलं. त्या मुद्द्यांना आमचा पाठिंबा राहिला आहे. एका भाषणाने राजकीय दिशा बदलते का? तर नाही. त्यासाठी काही काळ थांबावं लागेल. पाहावं लागेल. आम्ही वारंवार सांगतो की, राज ठाकरे यांची भूमिका भाजपधार्जिणी. एकनाथ शिंदे धार्जिणी आहे. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राचे शत्रू आहेत. राज ठाकरे तिकडे जातात हे राज्याच्या हिताचं नाही असं आमचं म्हणणं होतं. पण तरीही आम्ही त्यांच्या पुढच्या वाटचालीकडे लक्ष ठेवू, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

फडणवीस उत्तर द्या

राजकारणात कोणी एक चांगली भूमिका मांडत असेल, मग ते राजकीय विरोधक असले तरी त्या भूमिकेकडे सकारात्मक पाहिलं पाहिजे. अनेक लोकं ईव्हीएमवर भूमिका मांडत आहेत. आम्हीही महाराष्ट्रात त्यावर भूमिका मांडत आहोत. पण भाजपबरोबर सख्य असलेले राज ठाकरे किंवा एकनाथ शिंदे गटाबरोबर सख्य असलेले राज ठाकरे ही भूमिका मांडतात हे महत्त्वाचं आहे. हे मतदान गेलं कुठं? हे रहस्य आहे. त्यांनी एक उदाहरण दिलं. राजू पाटील यांच्या गावात 1400 मते आहेत. 1400 मतांच्या गावात राजू पाटील यांना एकही मत पडू नये हे संशयास्पद आहे. अशा तक्रारी शेकडो गावातून आल्या आहेत. राजू पाटील हे एक उदाहरण आहे. नेत्यांचा प्रभाव असलेल्या गावात मत मिळू नये हे रहस्य आहे. मोदी हे जादूगार आहेत. त्यांनी जादू कशी झाली सांगितलं पाहिजे. अमित शाह, फडणवीस यांनी याबाबत सांगितलं पाहिजे. राजू पाटील यांना भरघोस मतदान झालेलं असताना त्यांना एकही मत मिळू नये हा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला असेल तर त्याचं उत्तर कोणी द्यायचं? ते उत्तर फडणवीस आणि निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’
पुणे प्रकरणात गावकऱ्यांकडून मिळाली मोठी माहिती, ‘आरोपी आला अन्..’.
'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी
'... नाहीतर कपडे फाडून घरी पाठवू', राणेंनी काढली वडेट्टीवारांची लायकी.
संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर
संजय शिरसाट यांची सिडको बस स्थानकात पाहाणी; कर्मचाऱ्यांना धरले धारेवर.
डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध
डॉगस्कॉड अन् ड्रोन! बलात्कार करणाऱ्या आरोपीचा पकडण्यास पोलिसांचा शोध.
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा
VIDEO : एसटीच्या हायटेक 'शिवशाही'ची दयनीय अवस्था, दोरीनं बांधला दरवाजा.
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल
दीड हजार पानांचं आरोपपत्र; सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल.
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ
'जीव जळतो असं पाहून पण...', वसंत मोरेंचं ठाकरेंकडून कौतुक, ऐका ऑडिओ.
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?
स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?.
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार
बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! नराधम बापाकडून तीन मुलींवर अत्याचार.
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं
ढसाळ कोण?, सेन्सॉर बोर्डाला ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यानं झापलं.