Rajesh Tope | एका राज्यात एका लसीला परवानगी द्या, राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी
कोरोना लसीकरणासाठी एका राज्यात एका लसीला परवानगी दिल्यास रेकॉर्ड ठेवणं सोपं जाईल, असं राजेश टोपे म्हणाले. (Rajesh Tope Corona Vaccination)
औरंगाबाद : आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केंद्र सरकारकडे कोरोना लसीचा खर्च करण्याची मागणी केली आहे. एका राज्यात लसीकरण करण्यासाठी एका लसीलाच मंजुरी द्यावी, अशीही मागणीही राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे दिली आहे. ( Rajesh Tope demanded Modi Government should done free corona vaccination )
राज्यातील पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी दोन ते अडीच महिन्याचा कालावधी लागेल, असं राजेश टोपे म्हणाले. दरदिवशी 10 हजार प्रमाणं लसीकरण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस आरोग्य कर्मचारी, फ्रटलाईन कोरोना योद्धे यांना दिली जाणार आहे, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.
एका राज्यात एका लसीला परवानगी द्या
केंद्र सरकारनं सीरम इनस्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवक्सिनच्या लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. मात्र, एखाद्या राज्यात दोन लसींना लसीकरणासाठी मंजुरी दिल्यास त्याचे रेकॉर्ड ठेवणे अडचणीचे जाईल, असं राजेश टोपे म्हणाले. त्यामुळे कोरोना लसीकरणासाठी एका राज्यात एका लसीला परवानगी दिल्यास रेकॉर्ड ठेवणं सोपं जाईल, गोंधळ निर्माण होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.
लस आणि लसीकरणाचा खर्च केंद्रानं करावा
भारत सरकारन दोन लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. मात्र, देशातील परिस्थिती पाहता केंद्र सरकारनं लस आणि लसीकरणाचा खर्च करण्यासाठी खर्च करण्याची मागणी राजेश टोपे यांनी केली. गरिबांना लस देण्यासाठी केंद्रानं खर्च उचलणं गरजेचे आहे. कोरोना लसीचा साठा, लस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजचा खर्च आणि लसीकरण करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारनं द्यावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केल्याचं राजेश टोपेंनी सांगितले.
राज्यात ड्राय रन
केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय रनचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 2 जानेवारील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबारमध्ये ड्राय रन पार पडले होते.
राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्केंवर
महाराष्ट्रात सध्या दिवसाला 2 ते 3 हजार नवीन रुग्ण आढळतत आहेत. राज्यात काही दिवसांपूर्वी दर दिवशी 25 ते 30 हजार रुग्ण आढळत होते. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 96 टक्के आहे. कोरोनाच्या नव्या अवताराबाबत आम्ही सतर्क आहोत. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी ब्रिटनहून आलेल्या विमानांमधून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला.
आम्ही आमच्या प्रोटोकॉलनुसार अंमल बाजावणी कायम ठेवणार, तसे आम्ही केंद्राशी पत्र व्यवहारकरून इतर राज्यात देखील प्रोटोकॉल कायम राहावे, यासाठी सांगण्यात येणार जेणेकरून इतर राज्यातून आपल्या राज्यात रूग्ण संख्या वाढू नये,असं राजेश टोपे म्हणाले.
संबंधित बातम्या:
कोरोनाचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य, काळजी घ्या- आरोग्यमंत्री
विमानात एक कोरोनाबाधित आढळल्यास त्या रांगेतील सर्वच प्रवासी होणार क्वॉरंटाईन!
( Rajesh Tope demanded Modi Government should done free corona vaccination )