‘बाईकला हेल्मेट दाखवल्याशिवाय सुरूच होणार नाही’, लातूरमधील पट्ठ्याची जुगाडातून कमाल

लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात असलेल्या गुत्ती या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या राजीव केंद्रे या युवकाने मोटरसायकल अपघात आणि मोटारसायकल चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी एक किट तयार केलीय.

'बाईकला हेल्मेट दाखवल्याशिवाय सुरूच होणार नाही', लातूरमधील पट्ठ्याची जुगाडातून कमाल
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 8:17 PM

लातूर : लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात असलेल्या गुत्ती या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या राजीव केंद्रे या युवकाने मोटरसायकल अपघात आणि मोटारसायकल चोरीवर नियंत्रण आणण्यासाठी एक किट तयार केलीय. विशेष म्हणजे हे किट टाकाऊ वस्तूंपासून अत्यल्प पैशांमध्ये तयार करण्यात आलंय (Rajiv Kendre from Latur innovate a Bike Safety Kit with Helmet to prevent accident death).

आयटीआयमधून इलेक्ट्रॉनिकचा डिप्लोमा केलेला गुत्ती गावचा राजीव केंद्रे दरवर्षी काही ना काही जुगाड करीत असतो. यावर्षी त्याने हेल्मेटने मोटारसायकल सुरु करण्याचं किट शोधलंय. बाईकवर लावलेल्या किटला हेल्मेट दाखवल्याशिवाय बाईक सुरूच होत नाही. या किटमधून बाईक कोणत्या कंपनीची आहे, कोणते मॉडेल आहे, टायरची काय स्थिती आहे याचीही माहिती मिळते.

जुगाड करताना राजीवने जुन्या टीव्हीचा सेटअप बॉक्स, रिसिव्हर, वायरचे काही तुकडे आणि हेल्मेट असं साहित्य उपयोगात आणलं. बाईकच्या हँडलला लावलेल्या ट्रान्समीटरला हेल्मेटमध्ये बसवलेला रिसिव्हर जवळ नेऊन दाखवल्याशिवाय बाईक सुरूच होत नाही.

या जुगाडामुळे हेल्मेट वापरणे क्रमप्राप्त होईल. यामुळे अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी होईल. याशिवाय मोटारसायकल चोरीला देखील आळा बसेल, असं मत राजीव केंद्रे यांनी व्यक्त केलंय. ही किट तयार करायला अगदी पाचशे रुपयांचा खर्च लागला आहे.

लातूरच्या पट्ठ्याचा हा शोध सध्या जिल्ह्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. अपघातातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी हे महत्त्वाचं साधन असल्याचं नागरिक बोलत आहेत.

हेही वाचा :

प्लॅस्टिकपासून पेट्रोल, अवघ्या 40 ते 50 रुपये लिटरने विक्री

व्हिडीओ पाहा :

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.