राजू शेट्टी करणार महावितरणसमोर उपोषण; …आणि या मंत्र्याच्या कार्यालयावरही काढणार मोर्चा
शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खताचा दर कमी करा अन्यथा केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे.
कोल्हापूरः महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळावी यासाठी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी 22 तारखेला महावितरण (Mahavitran) कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. या मागणींसह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी यावेळी सांगितले की, शेतकऱ्यांना दिवस शेतीसाठी वीज (Electricity) मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, त्यांना 50 हजारचं कर्ज देण्यात यावे, याची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, केंद्रीय व राज्य रस्ते व राज्यमार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊनही त्यांच्याकडून टोल वसूल करण्यात येतो त्यामुळे येथून पुढे शेतकऱ्यांच्या जमिनी देणार नाही असा पवित्रा घेऊन त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबरोबरच शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सध्या शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खताचा दर कमी करा अन्यथा केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे.
शेतीसाठी दिवसा वीज मिळत नाही
कोरोना नंतर राज्यातील शेतकरी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे. त्यातच शासनाकडून वेगवेगळे नियम लावून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. तसेच सध्या शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळत नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी मिळणारी जी वीज आहे त्या पाण्याद्वारेच शेतीला पाणी द्यावे लागते, रात्रीच्या वेळी पाणी देत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असतात, त्यामुळे महावितरणमधून देण्यात येणारी वीज ही शेतकऱ्यांनी दिवसाही देण्याची मागणी करुन त्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी
केंद्रीय व राज्य रस्ते व राज्यमार्गासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात जमिनी घेतल्या जातात, त्यामुळे रस्त्यासाठी शेती गेलेले शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडता, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात त्याच शेतकऱ्यांकडून टोलही वसूल केला जातो, त्यामुळे इथून पुढे रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी देणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.
संबंधित बातम्या
अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात नाही, कारण काय?, अर्थसंकल्प 11 मार्च रोजी
इकडे संजय राऊतांची पत्रकार परिषद; आणि तिकडे भाजपची कार्यकारिणीच बरखास्त; कुठे झाली आहे बंडाळी