Rajya Sabha Election 2022 Video: का नेतेगिरी वाटते तेवढी सोप्पी नाही? जगताप, शाह, टिळक एक एका नेत्याचा आजचा व्हिडीओ बघा, उत्तर मिळेल !

अत्यंत आजारी, प्रवास करणं अशक्यच असतानाही अनेक आमदारांना आपल्या प्रकृतीची पर्वा न करता मतदानाला यावं लागलंय. राज्यसभेच्या मतदानाकरिता आज विधानभवनात दाखल झालेल्या आमदारांचे व्हिडिओ अत्यंत बोलके आहेत. 

Rajya Sabha Election 2022 Video: का नेतेगिरी वाटते तेवढी सोप्पी नाही? जगताप, शाह, टिळक एक एका नेत्याचा आजचा व्हिडीओ बघा, उत्तर मिळेल !
आमदार लक्ष्मण जगताप, महेंद्र दळवी, मुक्ता टिळक Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 1:34 PM

मुंबईः नेतेगिरी करणं आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसतं. आज मुंबईत रंगलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha Election) आखाड्यात हे दिसून आलं. अत्यंत चुरशीची अशी ही निवडणूक तब्बल 24 वर्षांनी होतेय. विधानसभेचे आमदार यासाठी मतदान करणार आणि यावरच राज्यसभेच्या उमेदवारांचं (Rajyasabha Candidates) भवितव्य ठरणार असल्यानं एक एक मत महत्त्वाचं आहे. प्रत्येक मताचं मूल्य कोट्यवधी रुपयांचं, त्यामुळे मत (Vote) देणाऱ्या आमदारांना चांगलाच भाव आलाय. त्यामुळेच अत्यंत आजारी, प्रवास करणं अशक्यच असतानाही अनेक आमदारांना आपल्या प्रकृतीची पर्वा न करता मतदानाला यावं लागतंय. राज्यसभेच्या मतदानाकरिता आज विधानभवनात दाखल झालेल्या आमदारांचे व्हिडिओ अत्यंत बोलके आहेत.

कर्गरोगाने त्रस्त मुक्ता टिळक मतदानासाठी हजर..

पुण्यातील कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक आजारी असतानाही आज मतदानासाठी आल्या. भाजप आमदार मुक्ता टिळक यांना कर्करोग झाला असून गेल्लया काही महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र आज पक्षादेशाचं पालन करण्यासाठी त्या मुंबईत मतदानासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांना इथवर आणण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपवण्यात आली होती.

लक्ष्मण जगताप कार्डिअॅक रुग्णवाहिकेतून आले…

पुण्याचेच पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हेदेखील मुंबईत दाखल झाले. दीड महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सुरुवातीला ते एअर अँब्युलन्समधील येतील अशी चर्चा होती. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुनसार त्यांना बाय रोड मुंबईत आणलं गेलं. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू शंकर जगताप आहेत.

अलीबागचे आमदार वॉकर घेऊन आले..

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीदेखील प्रतिकुल परिस्थितीत मतदानाला हजेरी लावली. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पायाला इजा झाली होती. त्यामुळे त्यांना चालण्यास अडचण येत होती. मात्र मतदान करण्यासाठी आज ते वॉकरच्या मदतीने चालत विधानभवनात पोहोचले.

आमदार पराग शाह यांनीही विधानभवन गाठलंच

मुंबईतील घाटकोपरचे आमदार पराग शाह यांनीदेखील प्रकृती बरी नसतानाही मतदानाचा हक्क बजावला. हातात काठी घेत भाजपच्या या आमदारांनी आज दुपारी विधानभवन गाठलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.