Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election 2022: कोण कुणाकडे?, अपक्षांची नावे वाचा एका क्लिकवर: एमआयएमच्या मतांसाठी नवा फॉर्म्युला काय?

Rajya Sabha Election 2022: एमआयएमकडे दोन आमदार आहेत. फारुक शाह आणि मोहम्मद इस्माईल हे दोन एमआयएमचे आमदार आहेत. एमआयएम सध्या राष्ट्रवादीशी संलग्न आहेत. शिवसेना आणि एमआयएमची विचारधारा एक नसल्याने एमआयएमची मते घेणं शिवसेनेसाठी डोकेदुखी झाली आहे.

Rajya Sabha Election 2022: कोण कुणाकडे?, अपक्षांची नावे वाचा एका क्लिकवर: एमआयएमच्या मतांसाठी नवा फॉर्म्युला काय?
अपक्षांची नावे वाचा एका क्लिकवर Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 6:32 AM

मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) आजचा मुहूर्त ठरलेला आहे. त्यासाठी आधी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार सेटिंग सुरू केली आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षाचे आमदार आपल्या हातातून निसटू नयेत म्हणून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जात आहेत. त्यांना आश्वासने दिली जात आहेत. काही नेत्यांनी तर थेट आमदार राहत असलेल्या हॉटेलातच काल रात्र मुक्काम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्या ट्रायडंट हॉटेलात शिवसेना (shivsena) आमदार आणि अपक्ष आमदारांना ठेवण्यात आले, त्याच हॉटेलात भाजपचे (bjp) उमेदवार धनंजय महाडिक उतरल्याने शिवसेनेसाठी दिवसच नाही तर रात्रंही वैऱ्याची झाली होती. तब्बल 23 वर्षानंतर राज्यसभेची निवडणूक होत आहे. मतदानाची प्रक्रिया अत्यंत तांत्रिक असल्याने या आमदारांना मतदानाचे प्रशिक्षणही देण्यात आली आहे. तसेच आपल्यासोबत किती अपक्ष आहेत आणि छोट्या पक्षांचे किती आमदार आहेत याची गोळाबेरीजही केली गेली आहे.

कोण कुणाच्या बाजूने?

महाविकास आघाडीच्या बाजूने

अबू आजमी (सपा) रईस शेख (सपा) गीता जैन (अपक्ष) देवेंद्र भुयार (स्वाभिमानी) मंजुळा गावित (अपक्ष) आशिष जयस्वाल (अपक्ष) किशोर जोरगेवार (अपक्ष) नरेंद्र भोंडकर (अपक्ष) श्यामसुंदर शिंदे (अपक्ष) संजय मामा शिंदे (अपक्ष) चंद्रकांत पाटील (जळगाव) विनोद निकोले (माकप) विनोद अग्रवाल (अपक्ष) राजकुमार पटेल (अपक्ष)

भाजपच्या बाजूने

रवी राणा (अपक्ष) रत्नाकर गुट्टे (रासप) महेश बालदी (अपक्ष) प्रकाश आवाडे (अपक्ष) विनय कोरे (जनसुराज्य पार्टी) प्रमोद पाटील (मनसे) राजेंद्र राऊत (अपक्ष)

कोण तळ्यातमळ्यात?

हितेंद्र ठाकूर (बविआ) क्षितीज ठाकूर (बविआ) राजेश पाटील (बविआ) बच्चू कडू (प्रहार)

एमआयएमसाठी नवा फॉर्म्युला

एमआयएमकडे दोन आमदार आहेत. फारुक शाह आणि मोहम्मद इस्माईल हे दोन एमआयएमचे आमदार आहेत. एमआयएम सध्या राष्ट्रवादीशी संलग्न आहेत. शिवसेना आणि एमआयएमची विचारधारा एक नसल्याने एमआयएमची मते घेणं शिवसेनेसाठी डोकेदुखी झाली आहे. त्यामुळे नवा फॉर्म्युला आता समोर येताना दिसत आहे. एमआयएमने राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांना मतदान करावं. त्याबदल्यात राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करावं, असा फॉर्म्युला आता समोर येत असून त्यावर एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या नेत्यात चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. हा फॉर्म्युला मान्य झाल्यास एमआयएमची मते ऐनकेनप्रकारे आघाडीलाच मिळणार आहेत.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.