Rajyasabha Election : संभाजीराजेंच्या खासदारकीचं ठरलं? उद्धव ठाकरे मोठ्या मनाचे, “वर्षा” भेटीनंतर विनायक राऊतांकडून सूचक विधान
साहजिकच ही भेट आणि राज्यसभेची निवडणूक याबाबत चर्चा तर होणारच, आता या भेटीनंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरील भेटीनंतर खासदारकीचं पक्कं झालंय का? असा सवाल सध्या राजकारणात विचारण्यात येतोय.
मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकांचे (Rajyasabha Election) वारे वाहत आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यातून 6 जागा या राज्यसभेवरून नवडून दिल्या जाणार आहेत. त्यात 2 भाजप, 1 काँग्रेस, 1 राष्ट्रवादी काँग्रेस, तर 1 शिवसेना असे सध्याचे गणित आहे. तर संभाजीराजे छत्रपती (Chatrapati Sambhajiraje) यांनी अपक्ष लढण्याची हाक दिल्याने सहाव्या जागेच गणित अजूनही फिक्स नाही. मात्र अशातच राज्यात मोठ्या हलचालींनी वेग आलाय. आजच संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या वर्षा या निवास्थानी दाखल होत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. साहजिकच ही भेट आणि राज्यसभेची निवडणूक याबाबत चर्चा तर होणारच, आता या भेटीनंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी एक सूचक विधान केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरील भेटीनंतर खासदारकीचं पक्कं झालंय का? असा सवाल सध्या राजकारणात विचारण्यात येतोय.
विनायक राऊत काय म्हणाले?
नितेश राणेंच्या वायफळ बडबडीला आम्ही काडीची किंमत देत नाही.स्वार्थासाठी राजकारण करणार राणे घराणं आहे. संभाजी राजेंनी जर उमेदवारीसाठी आपली इच्छा व्यक्त केली तर त्यात नाक मुरडण्यासारखं काय आहे? संभाजी राजे खासदार होऊ नये या इच्छेने काहीजण पछाडले आहेत. त्यांच्यामध्ये त्यांचा अंतर्भाव आहे. मात्र संभाजी राजेंविषयी निर्णय उद्धव ठाकरेंच घेऊ शकतात.आज ते त्यांना भेटायला गेले होते,उद्धव ठाकरे मोठ्या मनाचे आहेत, त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील, असे सूचक विधान विनायक राऊत यांनी केलं आहे.
राज ठाकरेंना अयोध्येला जायचा अधिकार नाही
विनायक राऊत एवढंच बोलून थांबले नाहीत तर यावेळी त्यांनी मनसेवरही जोरदार हल्लाबोल चढवला आहे. एका महिला कॉन्स्टेबलला धक्का मारून पाडायचं आणि पळून जायचं ही निंदाजनक गोष्ट होती. हा पळपुटेपणा मनसेच्या लोकांनी सुरू केला होता त्याला न्यायालयाने जामीन दिला असेल तर मला काही बोलायचं नाही आहे. मनसेला जनाची नाहीतर मनाची लाज असेल तर अशा देशपांडेची हकालपट्टी करायला हवी, असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. तर राज ठाकरेंना अयोध्येत जाण्याचा नैतिक अधिकारच नाही आहे.उद्धव ठाकरे अयोध्येत जात होते तेव्हा व्यंगचित्रातून विटंबना करणारे राज ठाकरे होते. केवळ राजकारणासाठी नौटंकी करण्यासाठी ते अयोध्येला जात असतील. शिवसेनेने ही अशी आंदोलने केली पण अस घाणेरडं राजकारण केलं नाही.आम्ही आंदोलन करताना त्यांना नग्न करून मारपीट करावी, त्यांची प्रॉपर्टी हडप करावी हा धंदा शिवसेनेने कधीच केला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.