शरद पवारांच्या गुगलीवर कोण क्लीनबोल्ड होणार, रामदास आठवलेंचे उत्तर काय ?
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत आरपीआय पक्षाचे रामदास आठवले यांनी मतदान करत शरद पवारांचे कौतुक करत ठाकरेंना कोपरखळी लागावली आहे.
गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई : आज एमसीएची म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनची (MCA) निवडणूक (Election) पार पडत आहे. नुकतेच मतदान प्रक्रिया पार पडली असून निकाल लवकरच हाती येणार आहे. यामध्ये अनेक राजकीय पक्षांनी मतदान केले आहे. 300 हून अधिक जणांनी यामध्ये मतदान केले आहे. त्यामध्ये माजी कसोटीवीर संदीप पाटील यांचा एक पॅनल आहे तर दूसरा पॅनल राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते आशीष शेलार यांचा एक पॅनल आहे. पवार आणि शेलार यांच्या पॅनलचे अमोल काळे आणि माजी भारतीय कसोटीवीर संदिप पाटील यांच्यामध्ये ही सरळ लढत होत आहे. मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळपास 343 इतके मतदान झाले आहे. त्यामध्ये अनेक राजकीय पक्षांच्या सदस्यांनी मतदान केले आहे. मात्र, यावेळी रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी शरद पवार आणि आशीष शेलार यांच्या पॅनलचा विजय होईल अशी खात्री व्यक्त करत असतांना शरद पवारांच्या गुगलीमध्ये ठाकरे यांचा क्लीनबोल्ड होणार असल्याचे म्हंटले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत आरपीआय पक्षाचे रामदास आठवले यांनी मतदान करत शरद पवारांचे कौतुक करत ठाकरेंना कोपरखळी लागावली आहे.
मतदानाचा हक्क बजावून झाल्यावर त्यांनी शरद पवार आणि आशीष शेलार यांच्या पॅनलचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
टीव्ही 9 शी बोलत असतांना रामदास आठवले यांनी शरद पवार हे जूने खेळाडू असून त्यांच्या गुगलीत उद्धव ठाकरे यांचा क्लीनबोल्ड होईल असं म्हंटले आहे.
शरद पवार हे कधी गुगली टाकतील आणि कुणाला आउट करतील हे सांगता येत नाही पण आत्ताच्या गुगलीत त्यांनी उद्धव ठाकरे यांना आउट केले आहेत.
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि आशीष शेलार यांच्याशी दोस्ती करून उद्धव ठाकरे यांना आउट केले आहे, शरद पवार पुढील काळात ते लवकरच मोठी खेळी खेळतील.
शरद पवार पुढील काळात 2024 च्या निवडणुकीत मोदींसोबत येतील, ठाकरे कुटुंबावर गुगली टाकत मिलिंद नार्वेकर यांना सोबत घेतले आहे. ठाकरे यांना सोडून मिलिंद नार्वेकर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जातील असं रामदास आठवले म्हणाले आहे.