रत्नागिरीः जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीची निवडणूक शिवसेना नेते रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातील संघर्षामुळे गाजत आहे. आज निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली असून यात रामदास कदम आणि त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांना मोठा धक्का दिल्याचे चित्र आहे. दापोली नगरपंचायत निवडणुकीतील एकूण जागांपैकी शिवसेनेनं 6 जागांवर विजय मिळवला आहे. अनिल परब यांच्या पाठिंब्यातून 11 पैकी 9 जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीला विजय मिळाला आहे. रामदास कदम आणि अनिल परब या दोन नेत्यांसाठी ही निवडणूत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. अजूनही काही जागांचे निकाल येणे बाकी असून पुढील काही तासात या निवडणुकीचे निकाल आणखी स्पष्ट होतील.
एकूण जागा-17
भाजप- 1
शिवसेना- 6
काँग्रेस-0
राष्ट्रवादी- 8
इतर(अपक्ष)- 2
दापोली नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाने आघाडी केली असून भाजप येथे स्वबळावर लढत आहे. तर काँग्रेस, मनसे आणि शिवसेना बंडखोर अशी बहुरंगी लढत या ठिकाणी पहायला मिळत आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांना बाजूला ठेवत सगळी सूत्रे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे दिली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी नाराज होऊन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
इतर बातम्या-