Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“पाठीमागं खंजीर खुपसण्याचं काम हे रामदास कदम करत नाही”; ईडी प्रकरणावरून कदमांनी नेमकं कुणाला सुनावलं

सदानंद कदम आणि अनिल परब यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर ती कारवाई रितसरपणे करण्यात आली आहे.

पाठीमागं खंजीर खुपसण्याचं काम हे रामदास कदम करत नाही; ईडी प्रकरणावरून कदमांनी नेमकं कुणाला सुनावलं
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 5:48 PM

गुहागर/रत्नागिरी : सध्या कोकणातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खेडमधील गोळी मैदानावर सभा झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. त्यातच रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कमद यांना ईडीकडून ताब्यात घेऊन 15 मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर रामदास कदम आणि त्यांचे भाऊ सदानंद कदम, अनिल परब यांच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या सदानंद कदम यांच्यावर आता रामदास कदम यांनी गंभीर आरोप केले आहेत.

तर अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांनी अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सदानंद कदम यांना अनिल परब यांनी फसवलं असल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

अनिल परब यांच्या ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर रत्नागिरीतील राजकारण प्रचंड तापले होते. त्यातच उद्धव ठाकर यांची गोळी मैदानावर सभा झाल्यानंतर सदानंद कदम यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली.

सदानंद कदम यांच्यावर कारवाई होताच विरोधकांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. सदानंद कदम यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही रामदास कदम यांच्यामुळे झाली असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर सदानंदर कदम यांच्याप्रकरणी आरोप केल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देत सांगितले आहे की, सदानंद कदम यांच्यावर जी ईडीची कारवाई झाली आहे त्यामध्ये रामदास कदम यांचा हात नाही.

तसेच पाठीमागं खंजीर खुपसण्याचं काम रामदास कदम कधीच करत नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

सदानंद कदम आणि अनिल परब यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर ती कारवाई रितसरपणे करण्यात आली आहे.

त्यामुळे त्या प्रकरणात माझा काही संबंध नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ईडीच्या कारवाईवर बोलताना ते म्हणाले की, ईडी माझ ऐकणार असती तर सर्वात पहिल्यांदा अनिल परब यांना आत टाकायला सांगितलं असतं असा टोला त्यांनी अनिल परब यांना लगावला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर सदानंद कमद यांच्यावर कारावई करण्यात आल्यानंतर राजकीय द्वेषापोटीच सदानंद कदम यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर करण्यात आला होता.

मात्र रामदास कदम या प्रकरणाविषयी बोलताना सांगितले की, अनिल परब यांनी सदानंद कदम यांना फसवण्यात आले असल्याचा आरोपही त्यांनी अनिल परब यांच्यावर करण्यात आला आहे.

रत्नागिरीच्या राजकारणावर बोलताना सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. सदानंद कदम यांच्यावर कारवाई झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी थेट रामदास कदम यांच्यामुळेच सदानंद कमद यांच्यावर कारवाई झाल्याचा आरोप केला होता.

त्यावर रामदास कदम यांनी आपल्या शब्दात प्रत्युत्तर दिले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, अनिल परब आणि सदानंद कदम हे केबल व्यावसायिक आहेत पार्टनर आहेत. त्यामुळे या प्रकरणी सगळ्यात आधी चौकशी ही अनिल परब यांची केली पाहिजे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.