श्रीकांत शिंदे यांच्या मेव्हण्याला तिकीट दिलं तर पराभव नक्कीच, रामदास भाईंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा; शिवसेनेत काय घडतंय?

कोकणातील विधानसभा मतदार संघातील जागा वाटपावरुन महायुतीतच भांडणं लागली आहेत. या वेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटांतच रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर गुहागरच्या उमेदवारीवरुन जोरदार टीका केली आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या मेव्हण्याला तिकीट दिलं तर पराभव नक्कीच, रामदास भाईंचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा; शिवसेनेत काय घडतंय?
ramdas kadam
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 9:56 PM

एकनाथ शिंदे आणि त्यांचा चिरंजीवाने एका नातेवाईकाला गुहागरमध्ये उमेदवार म्हणून दिला तर शिवसेना हे सहन करणार नाही. तर त्याला पराभवाचा सामना करावा लागेल हे सांगण्यासाठी कुणा जोशी नावाच्या ज्योतिषाची गरज नाही असा इशारा शिवसेना शिंदे गटातील रत्नागिरीतील नेते रामदास कदम यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचा मेहुणा विपुल कदम यांना गुहागर येथून उमेदवारी मिळण्याची चर्चा असून त्याला आता शिवसेनेतूनच विरोध सुरु झाला आहे.

गुहागर विधानसभा मतदार संघात श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना तिकीट देणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर शिवसेनेचे खेड येथील आमदार रामदास कदम यांनी परखड प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असं वाटतं नाही. अचानक बाहेरचा उमेदवार दिला तर येथे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरच अन्याय केल्या सारखे होईल असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.

तर मतदार संघात पाय ठेवणार नाही

विधानसभा निवडणूकांची घोषणा केव्हाही होण्याची शक्यता आहे.सर्वत्र जागा वाटपाचे सूत्र ठरत असताना कोकणातील जागांवरुन महायुतीतच जुंपली आहे. रामदास कदम यांनी विपुल कदम यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे. ते म्हणाले की विपुल कदम कोण ? त्यांचा गुहागर मतदार संघाशी संबंध काय ? शिवसैनिकांनी वर्षांनुवर्षे काम केलेले आहे. त्यांना डावलून जर मुखमंत्र्यांचे चिरंजीव आपल्या नातेवाईकांना संधी देणार असतील तर येथील शिवसैनिकांना ते भावेल असे मला वाटत नाही. अचानक सीट दिली तर नियमित काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल.नातेवाईक म्हणून विपुल कदमना सीट दिली तर त्याचा पराभव नक्की होईल असेही रामदास कदम यांनी सांगत ते पुढे म्हणाले की जर विपुल उमेदवार असेल तर त्याला माझ्या शुभेच्छा. पण मी गुहागर विधानसभा मतदार संघात आपण पाय ठेवणार नाही असाही इशारा रामदास कदम यांनी दिला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.