रामनवमी यात्रेत रहाट पाळणा तुटला आणि अनर्थ घडला…; गर्दीतच कोसळला पाळणा 4 जण झाले गंभीर…

अपघातातील रूग्णांवर पुर्णपणे मोफत उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून यामध्ये आणखी कुणी जखमी आहे का त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

रामनवमी यात्रेत रहाट पाळणा तुटला आणि अनर्थ घडला...; गर्दीतच कोसळला पाळणा 4 जण झाले गंभीर...
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 11:07 PM

शिर्डी : श्रीरामनवमी यात्रेतील रहाट पाळणा तुटून झालेल्या अपघातात चारजण गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. साईसंस्थानच्या प्रसादालयासमोरील जागेत हे पाळणे लावण्यात आलेले आहेत.यामधील एक खालीवर होणाऱ्या ट्रॉलीचा पाळणा अचानक तुटला. यामुळे पाळण्यातील काहीजण बाहेर फेकले गेले तर काहीजण पाळण्यात बसण्यासाठी बाजुला उभे होते त्यांच्यावर हे पाळणे आदळल्याने अनेकजण जखमी झाले आहेत. या दुर्घटने ज्योती किशोर साळवे (वय-45), किशोर पोपट साळवे, (वय-50) यांच्या पायांना गंभीर दुखापत झाली आहे.

याशिवाय भूमी अंबादास साळवे, (वय-14) हिच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. तसेच प्रवीण अल्हाट, (वय-45) हा तरुणही गंभीर जखमी झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातातील जखमींना तातडीने संस्थानाच्या साईबाबा रूग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचाराला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक व उपसंचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी सांगितले.

अपघातातील रूग्णांवर पुर्णपणे मोफत उपचार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून यामध्ये आणखी कुणी जखमी आहे का त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. डॉ. खुराणा, डॉ. प्रशांत गोंदकर, डॉ. राजु तलवार, डॉ. समीर पारखे यांनी तातडीने रूग्णांवर उपचार सुरू केले.

शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी व नंतर रूग्णालयात धाव घेतली आहे. या घटनेमुळे रामनवमी उत्सवाला गालबोट लागले असुन साळवे दाम्पत्य अत्यंत गरीब असुन त्यांच्या पायांना गंभीर इजा झाली आहे.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.