Ravsaheb danve : मुख्यमंत्री नसताना राज्य चालतंय, एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी सोपवा-रावसाहेब दानवे
राज्याचा मुख्यमंत्री अजारी असताना शिवसेनेने एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीने अजित पवार, काँग्रेसने अशोक चव्हाण यांना जवाबदारी दिली पाहजे, असा थेट सल्लाच रावसाहेब दानवे यांनी देऊन टाकला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने ते फारसे बाहेर पडत नाहीत, त्यामुळे सतत भाजपकडून त्यांच्यावर टीका होत आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही याच मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे, याआधीही भाजप नेते अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरून चिमटे काढताना दिसून आले आहेत आणि आता रावसाहेब दानवे यांनीही तेच केलंय.
एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी सोपवा
राज्याचा मुख्यमंत्री अजारी असताना शिवसेनेने एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीने अजित पवार, काँग्रेसने अशोक चव्हाण यांना जवाबदारी दिली पाहजे, असा थेट सल्लाच रावसाहेब दानवे यांनी देऊन टाकला आहे. अधिवेशनातही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीवरून चंद्रकांत पाटील महाविकास आघाडी सरकारला कोपरखिळ्या मारताना दिसून आले होते, चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज रश्मी ठाकरे यांच्याकडे द्यावा, असा सल्ला दिला होता. तर निलेश राणे यांनी तर मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात, अशी घणाघाती टीका केली होती. त्यावरून जोरदार घमासान झाल्याचे पहायला मिळाले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांनी जबाबदाऱ्यांचं वाटप करावे असा सल्ला दिला होता.
महाविकास आघाडीला अध्यक्षपदाची निडणूक नकोय
या अधिवेशनात आणि अधिवेशनानंतरही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दाही चांगलाच गाजला. त्यावरूनही भाजप महाविकास आघाडीला टोमणे मारायची संधी सोडत नाहीये, अध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी हे आघाडी सरकारमधील एकाही पक्षाला वाटत नाही. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिघांना विधानसभेचा अध्यक्ष होऊ द्यायचा नाही, असा टोला रावसाहेब दानवे यांनीही लगावला आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीवरून मुख्यमंत्री आणि राज्यपालांमधील लेटर वॉरही चांगलेच गाजल्याचं पहायला मिळाले.