Srikant Deshmukh : भाजपचे बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा, महिलेच्या व्हायरल व्हिडिओने माजलेली खळबळ

पुण्यात श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात याच प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.  तसेच आधी त्यांच्याविरोधात महिला आयोगाकडेही तक्रार करण्यात आली होती. तसेच याच प्रकरणात त्यांचं जिल्हाध्यक्ष पदही गेलं आहे.

Srikant Deshmukh : भाजपचे बडतर्फ जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा, महिलेच्या व्हायरल व्हिडिओने माजलेली खळबळ
बलात्कार प्रकरणात श्रीकांत देशमुख यांना जामीन मंजूर, पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 1:43 PM

पुणे : गेल्या काही दिवासांपूर्वी राज्याच्या राजकारणात एका व्हिडिओने (Viral Video) खळबळ माजवली होती. कारण एका नेत्याचा महिलेसोबत बेडरूममध्ये घालवलेल्या क्षणांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ त्या नेत्यासोबत उपस्थित महिलेने व्हायरल (Women Video) केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सोलापूरचे नेते श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांचे एका महिलेसोबत बेडरूममध्ये घालवलेले क्षण टिपण्यात आले आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे सोलापूर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पत्नी असताना याने माझ्याशी संबंध ठेवले असा थेट आरोप या महिलेने त्यांच्यावर केले होते. हे प्रकरण आता डेक्कन पोलिसांत पोहोचलं आहे आणि आता श्रीकांत देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण पुण्यात श्रीकांत देशमुख यांच्याविरोधात याच प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.  तसेच आधी त्यांच्याविरोधात महिला आयोगाकडेही तक्रार करण्यात आली होती. तसेच याच प्रकरणात त्यांचं जिल्हाध्यक्ष पदही गेलं आहे.

व्हायरल व्हिडिओत नेमकं काय?

व्हिडिओमध्ये महिला शेजारी बसलेल्या नेत्याकडे बोट दाखवत गंभीर आरोप करत आहे. ती संबंधित नेत्याकडे रडताना आणि ओरडताना दिसत आहे. हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की श्रीकांत देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. काही दिवसांपूर्वीच श्रीकांत देशमुख यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. नेते श्रीकांत देशमुख यांनी राजीनामा देताना कोणतेही कारण दिलेले नाही.

कुठला आहे व्हिडिओ?

हा व्हिडिओ 28 सेकंदांचा आहे. या व्हिडिओमध्ये नेते श्रीकांत देशमुख महिलेसोबत दिसत आहेत. हॉटेल किंवा कोणत्याही घराच्या बेडरूमचा हा व्हिडिओ असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात देशमुख पलंगावर बसलेत त्याचवेळी ही महिला रडत रडत त्यांच्यावर गंभीर आरोप करत आहे आणि देशमुख उठून संबंधित महिलेचा कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सगळं त्या व्हिडिओत स्पष्ट दिसून आलं आहे.

जिल्हाध्यक्षपदाचा पदभार विक्रम देशमुख यांच्याकडे

तसेच ती महिला म्हणतेय, ‘याने मला फसवले आहे. श्रीकांत देशमुख हे आहेत. त्याच्या पत्नीशिवाय त्याचे माझ्याशीही संबंध आहेत. या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी खळबळ माजली होती. त्यामुळे सध्या या पदाचा कार्यभार सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण देशमुख यांना आणखी किती महागात पडणार हेही पाहणं तितकेच महत्वाचं ठरणार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.