महाराष्ट्रातील या ठिकाणी आढळला दुर्मिळ एल्बिनो कोब्रा; इतर सापांपेक्षा या वैशिष्ट्यांमुळे तो दिसतो देखणा
सर्पमित्र नईम शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सापाला प्राकृतिक अधिवासात मुक्त करून त्याला जीवदान दिले आहे. तसेच सिरोंचा तालुक्यात यावर्षी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने जंगलातील साप शहराकडे येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी सांगितली.
गडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा येथील एका राईस मिलच्या खोलीत एक साप आढळून आला. राईस मिलमध्ये साप असल्याची माहिती सिरोंचा येथील सर्पमित्र नईम शेख यांना देण्यात आली. त्यानंतर सर्पमित्र नईम शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी राईसमध्ये बसलेल्या सापाला त्यांनी बाहेर काढले. त्यावेळी बाहेर काढलेल्या सापाचा रंग बघून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. तो साप अतिशय शुभ्र रंगाचा तो साप असल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे हा नाग दुर्मिळ असण्यासोबतच दिसायला अतिशय सुंदर आणि पांढरा शुभ्र असतो. हा साप व्हाईट एल्बिनो या नावनेही ओळखला जातो.
असल्याची माहिती सर्पमित्र नईम शेख यांनी दिली. तसेच या सापाची लांबी 4 फुट 9 सेमी असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे या प्रजातीच्या सापाची वाढ कमी होत असते. मात्र हा साप पुर्ण वाढलेला होता. त्वचेला होणाऱ्या अल्बीनझम या आजारामुळे त्वचा अगदी पांढरी शुभ्र होते.
पांढऱ्या त्वचेमुळे साप एल्बिनो म्हणुन ओळखला जातो. क्वचीत प्रसंगी सापामध्ये हा आजार दिसुन येत असल्याचेही सर्पमित्रांनी सांगितले.
गडचिरोली जिल्हयात कोब्रा प्रजातीचे साप मोठ्या संख्येने आढळून येत असले तरी एल्बिनो कोब्राची ही पहिलीच नोंद झाल्याचेही सांगण्यात आले आहे.
सर्पमित्र नईम शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी या सापाला प्राकृतिक अधिवासात मुक्त करून त्याला जीवदान दिले आहे. तसेच सिरोंचा तालुक्यात यावर्षी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने जंगलातील साप शहराकडे येत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी सांगितली. सर्पमित्र नईम शेख यांनी सिरोंचा तालुक्यात एक ओळख निर्माण झाली आहे.
त्यांच्या मार्गदर्शनात आढळलेल्या सापांना जीवनदान देऊन त्या सापांपासून लोकांना धोका निर्माण होऊ नये याचेही पूर्ण दक्षता घेत आहेत. त्यांच्या या प्राणीप्रेमामुळेच त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.