विधानसभेच्या निकालानंतर मोठा फेरबदल, राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा रश्मी शुक्लांची नियुक्ती, कारण…

रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीसांच्या खूप जवळच्या अधिकारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सतत होत असते.

विधानसभेच्या निकालानंतर मोठा फेरबदल, राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा रश्मी शुक्लांची नियुक्ती, कारण...
rashmi shukla
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 11:20 AM

Rashmi Shukla Reappointed Maharashtra DGP : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु असतानाच राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन आठवड्यांपूर्वी रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली होती. यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय वर्मा यांची नियुक्ती केली होती. आता राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा संपताच होताच पुन्हा एकदा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री राज्य सरकारकडून एक शासन आदेश जारी करण्यात आला. या आदेशात रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे म्हटले होते. आज (मंगळवार) पासून रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून पदभार स्वीकारतील, असे नमूद करण्यात आले आहे.

त्यातच रश्मी शुक्ला यांनी शनिवारी विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. यानंतर लगेचच सोमवारी रश्मी शुक्लांच्या पोलीस महासंचालक पदाच्या नियुक्तीचे शासन आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

दरम्यान अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी संजय वर्मा यांची राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी संजय वर्मा यांच्या नियुक्तीपत्रावर तात्पुरती नियुक्ती असे लिहिण्यात आले होते. यानंतर आता निवडणुका झाल्यानतंर सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

रश्मी शुक्लांवर आरोप काय होते?

रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे त्या वारंवार वादात अडकल्या होत्या. याआधी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रश्मी शुक्ला अवैध पद्धतीने फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप केला होता. नवाब मलिक यांनी शुक्ला या भाजपच्या एजंट असल्यासारखं काम करतात, असा आरोप केला होता. रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीसांच्या खूप जवळच्या अधिकारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सतत होत असते.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होताच तब्बल २८ पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यात १५ अधिकारी हे मुबंईतील होते. तसेच राज्यभरातील ३०० हून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. यात रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली आहे. त्यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली आहे. त्यांनी नियमबाह्य काम केली आहेत. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावण्याची कामेही त्यांनी केली आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. यानंतर निवडणूक आयोगाने त्यांची तात्काळ बदली केली होती.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.