कोकणात शिमग्याच्या उत्साहावर पाणी; पालखीवर निर्बंध, गावात येण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक

कोरोनामुळे चाकरमन्यांनी कोकणात येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यानंतरही गावी येण्याच्या निर्णयावर ठाम असणाऱ्या लोकांसाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. | Coronavirus Konkan

कोकणात शिमग्याच्या उत्साहावर पाणी; पालखीवर निर्बंध, गावात येण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक
कोकण होळी
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 3:01 PM

रत्नागिरी: कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरीत प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिमग्याच्या सणासाठी कोकणात जायला निघालेल्या चाकरमन्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जाणार आहे. कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केले. (Covid 19 Coronavirus test will be mandatory for people going in konkan villages for shimga holi festival 2021)

कोरोनामुळे चाकरमन्यांनी कोकणात येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यानंतरही गावी येण्याच्या निर्णयावर ठाम असणाऱ्या लोकांसाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यानुसार कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक आहे. जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तास आधीचा कोरोना चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक आहे.

पालखी उत्सवावर निर्बंध

गपणती आणि होळी हे कोकणातील दोन मोठे सण मानले जातात. होळीच्या काळात कोकणातील गावांमध्ये ग्रामदेवतेच्या पालख्या निघतात. त्यासाठी शहरातील लोक मोठ्याप्रमाणावर कोकणातील आपल्या गावी जातात.

यंदाही होळीच्या काळात कोकणात अशीच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र, प्रशासनाने येत्या दोन-तीन दिवसांची डेडलाईन देण्यासाठी आता उर्वरित दिवसांमध्ये कोकणाकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी प्रशासनाकडून पालखी उत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पालखी घरोघरी नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर कोकणात येणाऱ्या गावकऱ्यांचे गावातही स्कॅनिंग केले जाणार आहे. तसेच गावात नमन-खेळे या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

नागपुरात 15 मार्चपासून लॉकडाऊन

कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येमुळे नागपूर जिल्हा 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन (Lockdown in Nagpur) करण्याची घोषणा नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केली. नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत (11 मार्च सकाळी 8 वाजता) 1710 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या काळात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. असं असतानाही अनेक जणांच्या वर्तनात सुधारणा दिसत नाही. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाणंही वाढलंय. कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,34,023 वर पोहोचला आहे.

संबंधित बातम्या :

नागपूरमध्ये लॉकडाऊन जाहीर, 21 मार्चपर्यंत कडक निर्बंध

MPSC Preliminary Exam | मोठी बातमी, राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

CM Uddhav Thackeray Covid19 Vaccination | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घेतली कोरोनाची लस

(Covid 19 Coronavirus test will be mandatory for people going in konkan villages for shimga holi festival 2021)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.