Guhagar : दोन बैलांमध्ये 30 मिनिटं झुंज, बैल जखमी झाल्यानंतर पाहा नागरिकांनी काय केलं
30 मिनिटांपेक्षा अधिक दोन बैलांची झुंज चढाओढीत पाहायला मिळाली. बैल जखमी होत होते तरी झुंज सोडायला तयार नव्हते. नंतर तिथल्या नागरिकांनी काठ्या दगड यांच्या माध्यमातून झुंज सोडवली. काही उपस्थित लोकांनी तिथं व्हिडीओ शूट केला.
गुहागर : गुहागर (Guhagar) तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेत (shrugartali market) एका मैदानात दोन बैलांची झुंज (Two bull Fight) काल लोकांना पाहायला मिळाली. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ चालली ही झुंज सोडवायचा कुणीही प्रयत्न केला नाही. दोन बैलांची मैदानात लागलेली झुंज लोक पाहत बसली. कोकणातल्या लोकांना रेड्यांच्या आणि बैलांच्या झुंजी पाहण्याचं वेड आहे. त्यामुळे कुणीही झुंज सोडवण्यासाठी गेलं नाही. विशेष म्हणजे दुपारच्यावेळी तिथं मोठी गर्दी झाली होती.
ग्रामीण भागात रेड्यांच्या आणि बैलांच्या झुंजी पाहण्याचं लोकांना प्रचंड वेड असतं. दुपारच्या वेळेला अचानक दोन बैलांमध्ये झुंज लागली. ती पाहण्यात लोकं इतकी व्यस्त झाली की, झुंज सोडवायला कुणी सुध्दा गेलं नाही. शृंगारतळी बाजारपेठेतील नागरिकांनी झुंझीचा आनंद मनमुराद आनंद लुटला.